सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमविषयी अभिषेक बच्चन म्हणाला,”मी अनेक दिग्दर्शकांकडे काम मागितले होते”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येपासून चित्रपटसृष्टीत सध्या असलेल्या नेपोटिझमविषयीच्या चर्चा रंगलेल्या आहेत. नेपोटिझममुळे सुशांतसिंग राजपूत याला बाजूला करण्यात आल्याचा सतत आरोप केला जात आहे. ज्यामुळे त्याला काम मिळत नव्हते आणि या सर्व कारणांमुळे त्याने आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलले.

मात्र आता बर्‍याच स्टार किड्सनीही आपले अनुभव शेअर केले आहेत. यात मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याचेही नाव आहे. अलीकडेच अभिषेक बच्चनने खुलासा केला आहे की, अमिताभ बच्चन यांचा मुलगा असूनही आपल्या कारकीर्दीत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

अभिषेकने नुकताच खुलासा करताना सांगितले की, “१९९८ मध्ये मी आणि राकेश ओम प्रकाश मेहरा एकत्रच आपले करियर सुरू करणार होतो. मी त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणार होतो पण मला कोणीही लाँच करायला सापडले नाही. मी यासाठी बरेच प्रयत्न केले. मी किती निर्माते आणि दिग्दर्शकांना भेटलोय हेदेखील मला आठवत नाही. मी बर्‍याच लोकांना मला अभिनय करण्याची संधी देण्यास सांगितले.”

यानंतर, आम्ही दोघांनी स्वतःच काहीतरी करण्याचा विचार केला आणि त्यानंतर आम्ही ‘समझौता एक्सप्रेस’ या चित्रपटावर काम सुरू केले. मात्र, तो चित्रपट कधीही बनू शकला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.