उत्तर अफगाणिस्तानात तालिबानच्या आत्मघाती हल्ल्यात आणि गोळीबारात 9 जण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर अफगाणिस्तानात अतिरेकी आणि सरकारी सुरक्षा दलामध्ये झालेल्या गोळीबारात कमीतकमी 9 जण ठार तर अनेक जण जखमी झाले. तालिबानच्या एका आत्मघाती कारने केलेल्या बॉम्बस्फोटानंतर गोळीबार सुरू झाला. प्रांतीय परिषदेचे सदस्य रझ मोहम्मद खान याबाबत म्हणाले की, हा हल्ला समागम प्रांताची राजधानी ऐबक येथे झाला. या हल्ल्यात एका महिलेसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी 63 जण जखमी झाले आहेत.

खान यांनी असा इशारा दिला की, हा एक प्राथमिक आकडा आहे आणि मृतांची संख्या आणखीही वाढू शकते. ते म्हणाले की, या गोळीबारात किमान दोन तालिबानी सैनिक ठार झाले आहेत. यापूर्वी प्रांतीय रुग्णालयाचे प्रमुख अब्दुल खलील मुसाडिक यांनी सांगितले की, यामध्ये किमान 43 लोक जखमी झाले आहेत. तसेच लहान मुले आणि बहुतेक सामान्य नागरिकांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे. प्रांतीय परिषदेचे उपप्रमुख मोहम्मद हसीम सरवारी यांच्या म्हणण्यानुसार, या आत्मघातकी हल्लेखोरांनी आयबॅक येथील गुप्तचर विभागाला लक्ष्य केले आणि त्यानंतर इतर तालिबानी लढाऊंनी अफगाण सैन्यांवर गोळीबार केला.

ते म्हणाले की, ‘हा स्फोट इतका जोरात होता की कित्येक मैलांवरुन हा आवाज ऐकू आला तसेच यामुळे अनेक इमारती आणि घरांचे नुकसान झाले आहे. तालिबानचे प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की,’ प्रांतात सक्रिय असलेल्या तालिबान्यांनी अलीकडे त्यांचे हल्ले अधिकच तीव्र केलेले आहेत. तसेच हा स्फोट आणि या हल्ल्यामागे त्यांचाच हात आहे. हे तालिबानी सैनिक आणि सुरक्षा दलामध्ये बरेच तास चकमक चालली आणि घटना दूरची असल्यामुळे घटनेचे नेमके ठिकाण सांगितले गेले नाही.

हे उल्लेखनीय आहे की, हे समागम हे प्राचीन व्यापारी मार्गावर आहे आणि येथे तालिबानचे हल्ले खूपच वाढले आहेत, परंतु या भागातील इस्लामिक अतिरेक्यांशी, विशेषत: उझबेकिस्तानच्या इस्लामिक चळवळीशी अधिक संबंध असल्याने संघर्ष वाढला आहे. या प्रांतातील गव्हर्नरचे प्रवक्ता एस्मतुल्लाह मुराडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान्यांनी रविवारी उत्तर कंदुझ प्रांतातील सुमारे 14 चौक्यांना लक्ष्य केले आणि अफगाण सुरक्षा दलाच्या किमान 14 सदस्यांना ठार मारले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.