उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं; नारायण राणेंचा हल्लाबोल

मुंबई । ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे ती नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नाववर 56 खासदार निवडून आले. ते नसते तर 25 खासदारही निवडून आले नसते. यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली,” अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला … Read more

‘राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा! सर्व बाहेर काढेन’; नारायण राणेंचा धमकीवजा इशारा

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले. ”कुणाला बेडूक म्हणताय? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केलं. ते असते तर … Read more

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद; शेलारांची शेलकी टीका

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्या निमित्त केलेल्या भाषणातून केवळ जळफळाट दिसून आला. त्यात काही नवीन नव्हतं, असं सांगतानाच या भाषणात भाजपची दहशत होती याचाच आनंद झाला, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली होती. आशिष शेलार यांनी आज … Read more

कोरोना झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकही जण फडणवीसांप्रमाणे सरकारी रुग्णालयात भरती का झाला नाही? भाजपचा सवाल

मुंबई । ”विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात भरती झाले. यावरुन सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे. मग कोरोनाची लागण झालेल्या 16 पैकी एकाही मंत्र्याने शासकीय रुग्णालयात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही?” असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला विचारलाय.. (BJP MLA Atul … Read more

१ नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे ‘हे’ नियम बदलणार

नवी दिल्ली । १ नोव्हेंबरपासून (LPG) एलपीजी सिलेंडर, एसबीआय(SBI), डिजिटल पेमेंटचे नियम बदलणार आहेत. हे सर्व नियम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे आहेत. त्यामुळे नवे नियम जाणून घेणं गरजेचं आहे. एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरी यंत्रणेत १ नोव्हेंबरपासून मोठे बदल होणार आहेत. याशिवाय राज्यातल्या बँकांच्या वेळांमध्येही बदल होणार आहे. OTPशिवाय सिलेंडरची होम डिलेव्हरी होणार नाही घरगुती … Read more

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’वर पुन्हा एकदा डिसलाईक्सचा पाऊस, कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी घेतलं फैलावर

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’वर भाजप आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा डिसलाईक्सचा पाऊस पडला आहे. काल दसऱ्याच्या निमित्तानं मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. कोरोनाचं संकट असल्यानं सणासुदीच्या काळात काळजी घ्या. सीमेवर देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांसाठी दिवाळीत एक दिवा लावा, स्थानिक उत्पादनं खरेदी करा, लोकलसाठी व्होकल व्हा, असं आवाहन त्यांनी … Read more

‘हिंमत असेल तर धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन बघा’; विनायक मेटेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

पुणे । “उद्धव ठाकरे यांच्या भाषणात फक्त पोकळ गप्पा होत्या. हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर धनगर समाजाला, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन बघा”, असं आव्हान शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेंटेनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यांवर … Read more

कांदा लिलाव ठप्प पडल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकरी अडचणीत

नाशिक । केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रात ठेवण्यासाठी कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. शेतकरी सणासुदीच्या दिवसात अडचणी आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत आज ९० टक्के कांदा खरेदी बंद राहणार आहे. शासनाने केवळ २५ टन कांदा साठवणूक करण्याचे … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण, उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थकवा आणि अस्वस्थता जाणवत असल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले होते. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील … Read more

शेतकऱ्यांनंतर व्यापारी मोदी सरकारविरोधात आक्रमक; राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद

नाशिक । मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वधारले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मनमाड-बाजार समितीत कांद्याचा लिलाव बेमुदत बंद करण्यात आला आहे. तर पिंपळगाव-बसवंतमध्येही व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव रद्द केले आहेत. मोदी सरकारने … Read more