‘तुंबाड’फेम अभिनेता सोहम शहाच्या घरात चोरी, हातावरील टॅटूने पकडला गेला चोर

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक सोहम शाह याच्या घरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मात्र, चोरट्यांनाही लगेचच पकडण्यात आले आहे. चोरट्यांना पकडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. चोरांना पकडल्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्वीट करून त्याविषयीची माहिती दिली. प्रत्यक्षात चोरीच्या घटनेनंतर सोहम शहा यांनीजवळच्याच जुहू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. सोहम शहा यांच्याकडून मिळलेय माहितीचा आधार घेऊन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास केला. सीसीटीव्हीमध्ये पाहिले गेलेले हे दोन चोर शहा यांच्या इमारतीत शिरताना आणि बाहेर पडताना दिसत होते.

दोन्ही चोरट्यांनी त्यांच्या चेहर्‍यांवर मास्क घातले होते, मात्र त्यातील एका चोरट्याच्या डाव्या हातावर “मलिका” नावाचा टॅटू काढलेला होता. या टॅटूच्या आधारे पोलिसांनी विलेपार्ले येथील इंदिरा नगर येथून आरोपी प्रेम लंगनाथान देवेंद्र (वय २६) याला अटक केली. २६ मे रोजी शहा यांच्या घरातून २ सेल फोन आणि ३०००ची रोख रक्कम चोरून आरोपी फरार झाला होता. या आरोपींकडून पोलिसांनी पैसे आणि मोबाइल जप्त केले आहेत.

 

सोहम शाह हे आपल्या ‘सिमरन’, ‘तुंबाड,’ ‘शिप ऑफ थेसीस’ या चित्रपटांसाठी ओळखले जातात. तो सहसा आनंद गांधींसह चित्रपट करतो. त्याचा ‘तलवार’ हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला. त्यात त्याने ‘इरफान खान’ सोबत काम केले होते. मात्र यातील दुसरा आरोपी असलेला सुरेश प्रभू याचा पोलिस शोध घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here