हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले.६७ वर्षीय ऋषी कपूर यांना श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.याची पुष्टी त्यांचे भाऊ आणि अभिनेता रणधीर कपूर यांनीही केली.ऋषी कपूर यांचे निधन, तसेच ऋषी कपूर यांच्या निधनाने समस्त बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच संपूर्ण देशाला दुःख झाले आहे.अशातच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानेही ट्विट करून ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेता संजय दत्तने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे,’प्रिय चिंटू सर, माझ्या आयुष्यासाठी आणि करिअरसाठी तुम्ही नेहमीच प्रेरणास्थानी आहात. तुम्ही मला चांगले आयुष्य जगण्यास शिकवले आणि माझे वाईट दिवस असतानाही मला आयुष्याचा सामना करायला सांगितलेत.तुम्ही नेहमीच मला मार्गदर्शन केलंत.अनेक चित्रपटांत तुमच्याबरोबर काम करण्याचा मला बहुमान मिळाला.कर्करोगाविरूद्ध तुमची लढाई बराच काळ चालू होती.पण मला कधीच असं जाणवू दिले नाही की तुम्ही या आजाराशी संघर्ष करीत आहात,मी तुमच्याशी न्यूयॉर्कमध्ये बोललो तेव्हादेखील नाही… त्यावेळी तुम्ही परिपूर्णच वाटत होता. ‘
संजय दत्तने पुढे लिहिले की, काही महिन्यांपूर्वी घरी डिनरच्या वेळी मी तुम्हाला शेवटचे भेटलो होतो तेव्हासुद्धा तुम्ही माझ्याच काळजीत होतात.तुम्ही नेहमीच माझी काळजी घेतलीत.आज माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस आहे,कारण मी माझ्या कुटुंबातील एक सदस्य,मित्र, भाऊ आणि मला हसत आयुष्य जगण्यास शिकवणारी एक व्यक्ती गमावली, काहीही झाले तरीही. मला तुझी खूप आठवण येईल देवाची कृपा सदैव तुमच्या बरोबर राहो आणि स्वर्गात आपण कायम आनंदात राहो.चिंटू सर मी तुमच्यावर खूप प्रेम केले आहे आणि करतच राहीन.
२०१८ मध्ये ऋषी कपूर यांच्या कर्करोगाचे निदान झाले.त्यानंतर ते न्यूयॉर्क येथे उपचारासाठी गेले.जवळपास एक वर्ष उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये ते मुंबईत परत आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.