डब्ल्यूएचओ देखील चीनवर नाराज, कोरोनाशी संबंधित माहिती शेअर करत नसल्याचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर चीनच्या बाजूने असल्याचा सतत आरोप केला आहे. मात्र, आता कोरोनाव्हायरस लसीच्या संशोधनाच्या बाबतीत डब्ल्यूएचओ हे चीनवर खूपच नाराज असल्याचा खुलासा झाला आहे. यापूर्वीही चीनवर लस संशोधन करण्याच्या प्रयत्नांमध्ये मुद्दाम अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता. आताही चीन कोरोना विषाणूशी संबंधित संशोधनाचा डेटा शेअर करण्यासाठी डब्ल्यूएचओकडे सतत दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूशी संबंधित काही महत्वाची माहिती लपविली गेली आहे. चीनमधील अनेक सरकारी प्रयोगशाळांनी या सर्वांवर संशोधन केले आहे, असे सांगणारे ईमेल तसेच अधिकृत कागदपत्रांद्वारे असोसिएट प्रेसची तपासणी करण्यात आली आहे. चीनने पूर्ण झालेल्या कोरोनाच्या टेस्ट, औषधोपचार आणि लसी संबंधित डेटा डब्ल्यूएचओशी शेअर करण्यास उशीरच केला नाही तर अनेक गोष्टी लपवल्या असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

एपीला असे काही ईमेल मिळालेले आहेत ज्यात कोरोना विषाणूशी संबंधित अनेक प्रकारची माहिती आहे. मात्र, डब्ल्यूएचओ आणि अन्य प्रयोगशाळांना ही माहिती उपलब्ध करून देण्यास चीनला काही आठवडे लागले. या कागदपत्रांमध्ये अनेक ईमेल, चिनी आरोग्य मंत्रालयाची गोपनीय कागदपत्रे आणि डझनभर कोरोना रूग्ण आणि त्यांवर उपचार घेतलेल्या लोकांच्या मुलाखतींचा समावेश आहे. या ईमेलवरून असे दिसून आले आहे की,’ डब्ल्यूएचओने जाहीरपणे चीनवर टीका केली नसली तरी ही संस्था केवळ चीनकडूनच डेटा मागत नव्हती तर चीनला सर्व डेटा शेअर करत नसल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.’या संदर्भात, डब्ल्यूएचओ अधिकारी आणि चिनी आरोग्य मंत्रालयामध्ये ईमेलद्वारे अनेक संभाषणे झाली. डब्ल्यूएचओच्या मेलमध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की,’ चीनमुळे लसीचे संशोधन सुरू करण्यास उशीर झाला.’

या कागदपत्रांनुसार, डब्ल्यूएचओला कोरोनाशी संबंधित डेटा देण्यापूर्वीच हा सर्व डेटा चिनी सरकारी मीडिया सीसीटीव्हीवर प्रसारित केला जात होता. डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांनीही चीनच्या माध्यमांना १५ मिनिटांतच ही सर्व महत्वाची माहिती कशी मिळाली याबद्दल चीनला प्रश्न विचारला होता. एका बैठकीत चीनमधील डब्ल्यूएचओचे सर्वोच्च अधिकारी डॉक्टर गौदान गॅलेआ यांनीही चिनी अधिकाऱ्यांकडे याबद्दल कठोर शब्दांत जाब विचारला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.