सरकारच्या नावाखाली महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे – राजनाथ सिंह 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्रातील राजकारण देशभरात गाजते आहे. रोज नव्याने एकमेकांवर आरोप केले जातात त्याला उत्तरे दिली जातात. पुन्हा त्यावर काहीतरी विधाने केली जातात. आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील यावर आता टीका केली आहे. ते म्हणाले “महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे.”

भाजपच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणत होते. या संकटकाळात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे, ते सर्व काही चांगले दिसत नाही. असे ते म्हणाले. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा उल्लेख करत, शरद पवारांच्या हाती या सरकारची सूत्र आहेत तरीही असे घडते आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे असे म्हणाले. महाराष्ट्रात सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे का? महाराष्ट्र कोरोनाच्या बाबतीत आता चीनला मागे टाकेल अशी भीती व्यक्त होते आहे. या सगळ्याला सरकारची अकार्यक्षमता म्हणायचं का? असा प्रश्नही राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला आहे.

या सरकारमध्ये काहीही समन्वय नाही अशी टीका करत त्यांनी आम्ही सर्वतोपरी मदत करत असूनही महाष्ट्रातील संख्या नियंत्रणात नाही ही दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. जबाबदारी झटकून टाकणे ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे असे म्हणत त्यांनी राहुल गांधींसहित काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. सोनू सुदवरच्या टिकेवरून त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. यावेळी त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने आमचा विश्वासघात केल्याचा आरोप देखील केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.