कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मुस्लिम समाजाकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर संधी मिळावी. म्हणून माझ्या नावाची शिफारस कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल निवडीसाठी जे नियम आहेत, त्या सहकार क्षेत्रात मी गेली 10 वर्ष काम करत आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विचार व्हावा अशी मागणी सातारा जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष जाकिर पठाण यांनी केली आहे.
जाकिर पठाण म्हणाले, मी 1987 पासून कॉग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. भाजपा पक्ष सत्तेत असताना त्यांच्या विरोधात आंदोलने केली. भाजपा विरोधात आंदोलने करताना जिल्हाभर दौरे करून शिबिरे घेतली. अल्पसंख्याक समाजाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना पूर्णपणे संघटनेला वेळ दिला आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी या जिल्ह्यात काम करत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्ही अहोरात्र काम करतो. या सातारा जिल्ह्यात कॉग्रेस पक्षाकडून गेली 60 वर्षे मुस्लिम समाजाला कोणतेही सत्तेत स्थान देण्यात आले नाही.
यावेळी मुस्लिम समाजाला संधी द्यावी. त्यासाठी विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त माझी शिफारस केली आहे. राज्यपालांनी जे नियम घातले आहेत. त्यामध्ये सहकार क्षेत्रात काम करणारा मी गेले 10 वर्षापासून एका सोसायटीचा संचालक आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विचार व्हावा, यासाठी मी पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात , एम. एम. शेख, अखिल भारतीय अल्पसंख्याकचे अध्यक्ष नदीफ जावेद या सर्वांच्याकडे मी मागणी अर्ज दिलेला आहे. अशा मागणीचे पत्र अल्पसंख्याक अध्यक्ष जाकिर पठाण यांनी सोनिया गांधी यांना लिहले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.