SBI ची ग्राहकांना चेतावणी! ‘ही’ चूक कराल तर रिकामे होईल तुमचे खाते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना संभाव्य सायबर हल्ल्यांविषयी इशारा दिला आहे. रविवारी सायंकाळी बँकेने सोशल मीडियावर एक पोस्ट बनवून ग्राहकांना याबाबत अलर्ट राहण्यास सांगितले आहे. या पोस्टमध्ये काही मोठ्या शहरांमध्ये संभाव्य सायबर हल्ल्यांबद्दल सांगण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एसबीआयने ग्राहकांना आवाहन केले आहे की, हे हल्लेखोर कोविड -१९ च्या नावावर फेक ईमेल पाठवून लोकांकडून त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरून घेत आहेत. यापूर्वी दिल्लीच्या सायबर सेलनेही लोकांना त्यांच्या बँकेशी संबंधित असलेली माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करण्यास मनाई केली होती. हे हॅकर्स आपली बँक डिटेल घेत आहेत आणि आपले अकाउंट हॅक करत आहेत. एसबीआयने रविवारी केलेल्या एका ट्वीटमध्ये लिहिले की, “भारतातील काही बड्या शहरांमध्ये असा सायबर हल्ला होणार असल्याचे आमच्या लक्षात आले आहे.” [email protected] कडून येणार्‍या ईमेलवर क्लिक करणे टाळा, ज्यांचा सबजेक्ट ‘फ्री COVID-19 टेस्ट’ असा देण्यात आला आहे.

 

एसबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या सायबर गुन्हेगारांनी सुमारे २० लाख भारतीयांच्या ईमेल आयडी चोरी केलेल्या आहेत. हॅकर्स ई-मेल आयडी [email protected] या लिंक वरून लोकांची फ्री मध्ये कोरोना चाचणी करणार या नावाने वैयक्तिक आणि बँकेची माहिती घेत आहेत. एसबीआयने देशातील दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबादमधील लोकांना या फेक ई-मेलबाबत विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.

 

भारतीय कंप्यूटर इमरजेंसी रिस्पोंस टीमने (CERT-In) यापूर्वीच प्रत्येक सरकारी विभाग तसेच संस्थांना या संदर्भात एक चेतावणी जारी केली आहे. यावेळी हे हॅकर्स सर्वसामान्यांना लक्ष्य करण्यासाठी कोविड -१९च्या नावाने सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

 

यापूर्वी २०१६ मध्ये भारतीय बँकिंग संस्थांना भयानक हॅकर हल्ल्याचा सामना करावा लागला, ज्याचा परिणाम देशातील अनेक एटीएमवर झाला होता. ज्यामध्ये हॅकर्सनी डेबिट कार्डच्या पिनसह सर्व गोपनीय माहिती चोरली. ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता धोक्यात असल्याचे पाहून एसबीआयने काही दिवसातच जास्त रिस्क असलेल्या ग्राहकांना सुमारे सहा लाख नवीन डेबिट कार्ड जारी केली. त्याच्या उर्वरित बँकांनीही अशीच पावले उचलली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment