कामगारांना मोठा धक्का,’या’ कारणामुळे पीएफचे व्याज दर होऊ शकतात पुन्हा कमी; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सर्वसामान्यांच्या अडचणीत रोज वाढच होत आहेत. एकीकडे वाढती महागाई, तर दुसरीकडे बचतीचे व्याज दर सतत कमी होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ईपीएफओ-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे पुन्हा एकदा व्याज दरात कपात केली जाऊ शकते. त्यामागील मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकीवरील घटते उत्पन्न, असे सांगितले जात आहे आणि त्यामुळेप्रॉविडेंट फंड वरील व्याजदर कमी करण्याचा विचार केला जात आहे. आर्थिक वर्ष 2019-20 साठीचा पीएफ दर हा 8.65 टक्क्यांवरून 8.50 टक्क्यांवर आला आहे. मात्र अद्यापपर्यंत वित्त मंत्रालयाकडून त्याला मंजुरी मिळालेली नाही. अर्थ मंत्रालय जेव्हा मंजुरी देईल तेव्हाच कामगार मंत्रालय त्यास सूचित करेल.

काय आहे प्रकरण – इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, सूत्रांनी या वृत्तपत्राला सांगितले आहे की, सध्या या व्याज दराबाबत निर्णय घेण्यासाठी वित्त विभाग, गुंतवणूक विभाग आणि लेखापरीक्षण समिती लवकरच एक बैठक घेणार आहेत. यामध्ये ईपीएफओ किती व्याज देण्यास तयार आहे याबाबतचा निर्णय घेतला जाईल. ईपीएफओने आपल्या एकूण फंडांपैकी 85 टक्के फ़ंड हे डेट मार्केट (बाँड्स) आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मार्फत स्टॉक मार्केटमध्ये 15 टक्के गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ईपीएफओची गुंतवणूक ही 74,32414 करोड रुपये होती आणि त्यांना 14.74% रिटर्न मिळाला होता.

व्याजदर का घसरतील ? ईपीएफओने 18 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. त्यापैकी एनबीएफसी कंपनी दिवाण हौसिंग आणि आयएल अँड एफएसमध्ये सुमारे 4500 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. डीएचएफएल दिवाळखोरीच्या ठराव प्रक्रियेतून जात आहे, तर आयएल अँड एफएस वाचविण्यासाठी सरकारी पाळत ठेवली जात आहे. त्यामुळे ईपीएफओची एवढी मोठी रक्कम अडकली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.