अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महागाई भत्त्यावरील बंदी दूर करताना 24 टक्के वाढीसाठी दिली मान्यता, यामागील सत्य जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सोशल मीडियावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हवाल्याने दावा केला जात आहे की, त्यांनी महागाई भत्ता (DA) वरील बंदी मागे घेतली आहे. एवढेच नव्हे तर अर्थमंत्र्यांनीही त्यातील 24 टक्के वाढीस मान्यताही दिली आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे कि, 24 टक्के वाढीनुसार लाभार्थ्यांना थकबाकी देखील देण्यात येईल. त्यात एक मॉर्फ्ड फोटोही वापरण्यात आलेला आहे. यावेळी लोकं केंद्र सरकारच्या (Central Government Scheme) योजनेच्या नावाखाली देखील फसवणूक करीत आहेत. फसवणूक करणारी लोकं पहिले केंद्र सरकारच्या नावाखाली फेक न्‍यूज किंवा व्हिडिओ किंवा मेसेज व्हायरल करतात (Fake Video/News/Message). यानंतर ही लोकं फसवणूक करतात आणि आर्थिक नुकसान करतात. या बातमी मागचे सत्य काय आहे ते जाणून घ्या.

https://twitter.com/PIBFactCheck/status/1333743765052219393?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1333743765052219393%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Ffake-alert-finance-minister-nirmala-sitharaman-removed-restrictions-from-dearness-allowance-and-approved-increment-by-24-percent-know-the-truth-achs-3360528.html

दावा केला जात आहे
पीआयबीने ट्विट केले की, ‘केंद्र सरकारने महागाई भत्त्यावरील बंदी मागे घेतल्याचे एका व्हायरल मेसेजमध्ये सांगितले जात आहे. तसेच डीएमध्ये 24 टक्के वाढीसही मान्यता देण्यात आली आहे. या व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही माहिती दिलेली आहे. तसेच वाढीव रक्कम लाभार्थ्यांना थकबाकी म्हणून दिली जाईल असेही लिहिले आहे. त्यात अर्थमंत्र्यांचा एक मॉर्फ्ड फोटोही ठेवण्यात आला आहे. ही माहिती पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

पीआयबीने लोकांना हा सल्ला दिला
#PIBFactCheck मध्ये हा दावा बनावट असल्याचे आढळले आहे. पीआयबीने लोकांना केंद्र सरकारच्या कोणत्याही निर्णयासह आलेल्या माहितीचे सखोल परीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजना व प्रत्येक निर्णयाची माहिती संबंधित मंत्रालयाने यापूर्वीच जाहीर केली आहे. म्हणूनच मंत्रालयाच्या वेबसाईटची तपासणी करून, पीआयबी आणि प्रत्येक योजनेशी संबंधित इतर विश्वासार्ह चॅनेल्सवर विश्वास ठेवा. यासह असे म्हटले जाते की, आपण अशा बातम्यांवर विश्वास ठेवल्यास आपल्याला नफ्याऐवजी आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment