उद्योजक ‘डीएसके’ यांच्यासह पत्नी, मुलाला सांगली पोलिसांकडून अटक

गुंतवणूक रकमेला व्याज तसेच वस्तू खरेदीवर सवलतींचा वर्षाव करून सांगलीकरांना पावणेपाच कोटीचा गंडा घालणार्‍या उद्योजक दीपक कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्यासह पत्नी व मुलाला सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज अटक केली. सांगली शहर पोलिस ठाण्यात या तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा आहे. अटक केलेल्यांमध्ये डिएसके, त्यांची पत्नी हेमंती व मुलगा शिरीष यांचा समावेश आहे.

‘एलबीटी’ पोटी सांगली मनपाला दिले जाणारे अनुदान सरकारने थांबवले

राज्य सरकारने ‘एलबीटी’च्या नुकसान भरपाईपोटी दिले जाणारे स्थानिक स्वराज्य संस्थाचे अनुदानही थांबवले असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे सांगली महापालिकेला एक तारखेच्या आत जमा होणारे १२ कोटी ६९ लाख रुपयाचे एलबीटीचे अनुदान दहा तारीख ओलांडली तरी न आल्याने कर्मचार्‍यांचे पगार थांबले आहेत. दरम्यान महापालिका प्रशासनाने घरपट्टी वसूलीतून देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कर्मचार्‍यांचे पगार थकल्याने कर्जाच्या हप्त्याचे संकट निर्माण झाले आहे. सध्या ‘एलबीटी’चे अनुदान आले नाही तर महापालिकेसमोर एलबीटी कर वसुली करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती आहे.

टोमॅटोचे दर ५ रुपये किलोंवर! शेतकरी मोठ्या चिंतेत

उशिरापर्यंत राहिलेला पाऊस आणि नंतर आलेला अवकाळी पाऊस यांनी शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. एकीकडे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीमधून शेतकरी उभारी घेत असताना मागील काही दिवसांमध्ये बाजारात टोमॅटोची आवक वाढली. सोमवारी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७० क्विंटल आवक झाल्याने टोमॅटोची ३ ते ५ रुपये किलोने विक्री झाली. बाजारात टोमॅटो आणण्याचा खर्चही न निघाल्याने येथील एका शेतकऱ्याने टोमॅटो चक्क रस्त्यावर टाकून दिला.

‘यामाहा’ची लोकप्रिय स्पोर्ट बाइक ‘R15’ नव्या अवतारात लाँच

‘यामाहा’ कंपनीने आपली लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक यामाहा R15 V3 (Yamaha R15) नव्या BS-6 इंजिनसह लाँच केली आहे. यापूर्वी यामाहाने BS6 इंजिनसह FZ आणि FZS या दोन बाइक्स भारतात लाँच केल्या आहेत. R15 V3 च्या BS6 व्हर्जनची किंमत 1.46 लाख रुपये(एक्स-शोरुम) आहे.

भाजप आमदार मंगलप्रभात लोढा देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर,संपत्ती जाणून घेतल्यास व्हाल थक्क!

भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वांत श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. लोढा व त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती ३१,९६० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यंदाच्या चालू वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आहे.

ग्रामीण भागातील हॉटेलमधून कांदा भजी गायब! सर्वसामान्यांना कांद्याचे भाव सोसवेनात

मराठमोळ्या खाद्यपदार्थाच्या मांदियाळीत कांद्याची स्थान अनन्यसाधारण आहे. त्यात कांदा भजी कोणाला आवडत नाहीत ? असा अन्नपदार्थांची चव वाढवणारा कांदा काही दिवसापासून मात्र स्वयंपाक घरातील आपले स्थान ही गमावून बसला आहे. एरवी 15 ते 20 रुपये किलोप्रमाणे मिळणारा कांदा आता शंभरी पार केल्यामुळे हॉटेलमध्ये कांदा भजी व कांदा पोहे विकणे हॉटेल चालकांना परवडत नसल्यामुळे कांदा-भजी ग्रामीण भागातील हॉटेलमधून गायब झाली आहेत. तर सर्वसामान्यांनाही कांद्याचे भाव सोसवेनासे झाले आहेत.

आयफोन आता सामन्यांच्या आवाक्यात, माफक किंमतीत iPhone 9 होणार भारतात लाँच

जगप्रसिद्ध कंपनी ऍपल आपल्या मोबाईल बनवण्याच्या वैशिष्टगुणांमुळे नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरते. मात्र त्यांच्या मोबाईल फोन च्या किमती ह्या आवाक्याबाहेच्या असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ते खरेदी करण्यासाठी नाराजी दर्शवतात. मात्र आता ऍपल ने हिची बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी खुशखबर आणली आहे. ऍपल कंपनी लवकरच भारतामध्ये सर्वात स्वस्त आयफोन लाँच करण्याच्या तयारीमध्ये असल्याचे समोर आले आहे.

स्टेट बँकेच्या या निर्णयाने गृह आणि वाहन कर्ज लवकरच स्वस्त होणार

एसबीआयच्या एमसीएलआरशी संबंधित असलेली गृह, वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहेत.  नुकताच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर व्याजदरात बदल करणारी ‘एसबीआय’ पहिली बँक ठरली आहे. या व्याजदर कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता ८ टक्क्यावरून ७. ९० टक्के झाला आहे.

कांद्याचे भाव तब्बल ५ हजारांनी घसरले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याला २० हजार रुपये देण्याची विक्रमी घोषणा केल्यानंतर शनिवारी जवळपास ५०० ते ७०० ट्रक कांदा बाजार समितीत दाखल झाला. मात्र हा कांदा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने कांद्याचा दर सरासरी ५ हजाराने कोसळला आहे. साठवणूक केलेला कांदा व्यापारी पुन्हा बाजारात आणत असल्याने आवक वाढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज सरासरी कांदा ३ हजार ते १० हजार प्रति क्विंटल दराने गेला आहे.

काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला १५ हजार कोटींचा फटका

जम्मू आणि काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा ५ ऑगस्ट रोजी हटवण्यात आल्यानंतर, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला असून केंद्राच्या निर्बंधांनंतर काश्मिरातील हस्तव्यवसाय, पर्यटन आणि ई-कॉमर्स या व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे, असा दावा काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (केसीसीआय) अध्यक्ष शेख आशिक हुसेन यांनी केला आहे.