वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही रूप धारण करत होते. त्यांच्या या प्रवेशाने अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

भारिप-बमस आणि वंचित बहुजन आघाडीला विधानसभा आणि जिल्हा परिषदेत मोठा धक्का बसणार हे पूर्वनिश्चित होते. या दोघांनी राजीनामा दिल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार हे निश्चित होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश लांबला होता. याचा फायदा घेत वंचित बहुजन आघाडीने यांचा परेश रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. अडचणी निर्माण करू पहिल्या मात्र त्यांना फारसे यश आले नाही शेवटी आज राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने या दोन नेत्यांनी राष्ट्रवादीत पुढाकार घेतला

 

हरिदास भदे हे अकोला पूर्व मतदार संघातून दोनदा आमदार झाले होते. तसेच बळीराम सिरस्कार बाळापूर मतदार संघाचे आमदार होते. यांच्या प्रवेशाबद्दल खूप शंका होत्या मात्र आज या सर्व शंका मिटल्या आहेत. पक्ष प्रवेशाची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिली आहे. या प्रवेशाच्यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे आणि राहुल डोंगरे उस्थित होते. राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचे अडीच महिन्यापूर्वीच निश्चित केले होते असे हरिदास भदे यांनी सांगितले तर वंचित मधील वाद या प्रवेशासाठी कारणीभूत ठरले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment