हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूने आता बॉलिवूड मध्ये एकाधिकारशाही आणि घराणेशाही विरोधात आवाज उठवला जात आहे. रोज नव्याने अनेक कलाकार बोलते होत आहेत. सोशल मीडियावरून आपले अनुभव शेअर करत आहेत. अनेक नामांकित कलाकार या एकाधिकारशाहीचा विरोध करत समोर येत आहेत. आता बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणून ओळख असणारा अक्षय कुमारदेखील यावर अप्रत्यक्षरीत्या बोलला आहे. एका मुलाखतीत माझ्या स्टारडमचा फायदा माझ्या मुलांना घेऊ देणार नाही असे तो म्हणाला आहे.
स्टार किड्सवर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. एका मुलाखतीत अक्षय कुमार ने घराणेशाहीवर बोलत म्हंटले आहे की, माझ्या मुलांना घराणेशाहीचा फायदा बिलकूल मिळणार नाही. तो म्हणाला, “घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात आहे. तुम्ही कोणालाही त्यांच्या कुटुंबियांना काम देण्यापासून थांबवू शकत नाही. आई-वडिलांच्या ओळखीवर एखाद्या व्यक्तीस संघर्ष केल्याविणा संधी मिळू शकते. पण मेहनत केल्याशिवाय घराणेशाहीच्या आधारावर दिर्घकाळ टिकता येत नाही. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतील असेही ते म्हणाले.
“आरव आणि नितारा या माझ्या दोन्ही मुलांना मी आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत. त्यांना इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर माझ्या स्टारडमचा फायदा मी घेऊ देणार नाही. त्यांनी स्वत: ऑडिशन द्यावी आणि कामं मिळवावी अशी माझी अपेक्षा आहे. कारण संघर्ष केल्याशिवाय यशाचा खरा आनंद त्यांना मिळणार नाही.” असेही अक्षय म्हणाला त्याच्या या वक्तव्यामुळे सध्या अक्षय सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.