हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अडीच महिने राज्यातील कोरोनाची स्थितीचे राजकारण केले जात आहे. रोज नव्याने ठाकरे सरकारवर आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्या. यासंदर्भात एका वृत्तपत्राच्या ऑनलाईन मुलाखतीत अभिनेता जितेंद्र जोशी याला प्रश्न विचारला असता त्याने मुख्यमंत्र्यांच्या बाजूने मत मांडले आणि मुख्यमंत्र्यांच्या जागी दुसरे कोण असते तर डोक्याला हात लावला असता असे विधान केले
गेल्या दोन अडीच महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. मात्र राज्यातील ही परिस्थिती हाताळताना त्यांचा कस लागला आहे. ते सतत विविध माध्यमातून संवाद साधण्याचा, परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतः जातीने सर्व ठिकाणी लक्ष देत आहेत. परिस्थितीनुसार निर्णय घेत आहेत. याबाबत जितेंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी सर्वांच्या टीकेला उत्तर देत मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचं प्रशासन जे काही काम करत आहेत. त्यावर अनेक जण टीका करत आहेत. मात्र ठाकरे सरकार येऊन किती दिवस झाले? टीका करणं सोपं आहे. पण आज करोनाच्या संकटकाळात त्यांच्या जागी इतर कोणीही त्या खुर्चीवर असतं तरी डोक्याला हात लावला असता”, असं जितेंद्र म्हणाले. या मुलाखतीत त्यांनी राज्यातील एकूण परिस्थितीवर भाष्य केले तसेच विविध घटनांवर आपले मत व्यक्त केले आहे. संवेदनशील मनाचा अभिनेता अशी त्याची ओळख आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.