नवी दिल्ली । महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) 22 जानेवारी 2021 रोजी पुणे विभागातील 5579 फ्लॅट्स आणि 68 भूखंडांसाठी लॉटरी सोडत काढण्यास सुरुवात केली आहे. ज्या अर्जदारांनी या योजनेंतर्गत अर्ज केले होते, त्यांचे नाव या सोडतीत आले असेल तर ती माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. कोविड १९ नंतरही जवळपास 53,000 अर्ज आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही सोडत पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमधील भूखंड आणि फ्लॅटसाठी निघणार आहे.
प्राधिकरणाने घोषित केले की, कोविड मध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून YouTube वर ऑनलाईन सत्र घेण्याचीही योजना आखली गेली आहे. लॉटरी विजेत्यांना मेसेजद्वारे याची माहिती देण्यात येईल. स्वीकारलेल्या अर्जाची लिस्ट वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात येईल.
अशाप्रकारे आपले नाव चेक करा
लॉटरीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही म्हाडाची वेबसाईट https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ वर लॉग इन करू शकता.
फ्लॅटची किंमत 30-40% कमी आहे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना ऑनलाईन सुरू केली. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने म्हणाले होते की,” आम्ही लोकांना कमी किंमतीत घरे उपलब्ध करून देत आहोत, एका सदनिकेची किंमत बाजारभावापेक्षा 30-40 टक्क्यांपेक्षा कमी असेल. लोकांनी ज्या पद्धतीने यासाठी अर्ज केला आहे यावरून हे स्पष्ट आहे की, बाजारात लोकांना घराची खूप गरज आहे. ही एक अगदी पारदर्शक प्रक्रिया आहे जेणेकरून लोकांना वाजवी आणि कमी किंमतीत घरे मिळू शकतील.
नोएडामध्येही भूखंडांची विक्री होत आहे
नोएडा प्राधिकरण 23 दिवसात 341 भूखंड खरेदी करण्याची संधी देत आहे. हे सर्व भूखंड नोएडाच्या एकूण 18 सेक्टर मधील आहेत. हे भूखंड ऑनलाईन खरेदी करण्यासाठी तुम्हाला नोएडा प्राधिकरणाच्या वेबसाईटवर जाऊन त्या भूखंडासाठी बोली लावावी लागेल. नोएडा प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार सेक्टर 31, 39, 41,43,44, 46, 47, 49, 51, 52, 53, 70, 72, 92, 99, 105, 108 आणि 122 क्षेत्रातील सर्व 341 भूखंड रिक्त आहेत. प्रत्येक प्लॉटनुसार, त्याचे दर आधीच निश्चित आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.