आइस्क्रीमवर 10 रुपये जास्त घेणे ‘या’ रेस्टॉरंटला पडले महागात, 10 रुपयांसाठी ठोठावण्यात आला 2 लाख रुपये दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई सेंट्रल मधील शगुन व्हेज रेस्टॉरंटमध्ये 6 वर्षांपूर्वी आईस्क्रीम पॅकेटवर दहा रुपये जास्तीचे आकारणे महागात पडले. जिल्हा फोरमने या रेस्टॉरंटला यासाठी सुमारे 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, फोरमने ग्राहकांना नुकसान भरपाईचे आदेश देखील दिलेले आहेत. फोरमने आपल्या आदेशानुसार असे सांगितले की, 24 वर्षांपासून रेस्टॉरंटला दररोज सुमारे 40 ते 50 हजार रुपये उत्पन्न होत आहे. अशा परिस्थितीत रेस्टॉरंटने Maximum Retail Price (MRP) पेक्षा जास्त शुल्क आकारून नफा कमावला हे स्पष्ट आहे. जिल्हा फोरमने या दोन लाख रुपयांच्या अतिरिक्त ठेवीचे आदेश देताना सांगितले की, अशा प्रकारे फसवणूक व बेईमानी करून रेस्टॉरंट्स व दुकानांच्या वतीने व्यवसाय करणे योग्य नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
टाईम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, रेस्टॉरंटने पोलिस उपनिरीक्षक भास्कर जाधव यांच्याकडून आईस्क्रीमच्या फॅमिली पॅकसाठी 165 ऐवजी 175 रुपये घेतले होते. 2015 मध्ये जाधव यांनी दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाकडे तक्रार केली.

2014 चे प्रकरण
पोलिस उपनिरीक्षक जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 8 जून 2014 रोजी रात्री ते डीबी मार्ग पोलिस स्टेशन येथून घरी जात होते. यावेळी ते रेस्टॉरंटमध्ये गेले आणि कुटुंबासाठी आईस्क्रीम खरेदी केली. जाधव यांनी सांगितले की, एकाच किंमतीत 2 फॅमिली पॅक मिळाले, मात्र 10 रुपये अतिरिक्त शुल्क पाहून त्यांना धक्काच बसला.

रेस्टॉरंटने ग्राहकांची तक्रार ऐकली नाही
या प्रकरणी त्यांनी तक्रारदार जाधव यांनी जिल्हा ग्राहक मंचाला सांगितले की, त्यांनी रेस्टॉरंटमध्ये याला विरोध केला पण तेथे कोणी त्यांचे ऐकले नाही. ते म्हणाले की त्याने काउंटरवरूनच आईस्क्रीम विकत घेतली आणि रेस्टॉरंटमध्येही प्रवेशही केलेला नाही. यावर रेस्टॉरंटने उत्तर देताना त्यांना सांगितले की, आईस्क्रीम साठवण्यासाठी ते जास्तीचे 10 रुपये आकारले गेलेले आहेत.

रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाने कोणतीही एक्सट्रा सेवा घेतली नाही
जिल्हा फोरमने सांगितले की, वेटरकडून पाणी मागणे, फर्निचर वापरणे, फॅन किंवा एअर कंडिशनरखाली स्वत: ला थंड करणे इत्यादी कोणत्याही रेस्टॉरंट सेवेचा जाधव यांनी लाभ घेतला नाही. माउथ फ्रेशनर हे सहसा बिलासह दिले जाते. म्हणून, फोरमने असे म्हटले की यावर अतिरिक्त शुल्क आकारणे योग्य नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.