उद्धव ठाकरेंचा ‘हा’ फोटो शेअर करून नितेश राणेंनी उडवली खिल्ली 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट मुळे नितेश राणे सतत चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंट सतत काहीतरी शेअर करून ते वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. आता आणखी एका पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सार्वजनिक रित्या खिल्ली उडवली आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून एक संपादित फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोमुळे ट्विटर वरील ठाकरे समर्थकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

रामायणात हनुमानाने आपली छाती फाडून प्रभू श्री राम आणि सीता यांचे चित्र दाखविले होते. असे अनेक फोटो आहेत. असाच एक फोटो संपादित करून हनुमानाच्या जागी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चेहरा व प्रभू श्री राम व सीता यांच्या जागी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा चेहरा लावला आहे. उद्धव ठाकरे यांचा हा फोटो त्यांनी शेअर केल्यावर तात्काळ त्यांच्या समर्थकांनी असे खूप फोटो आहेत जे आम्हीही शेअर करू शकतो अशा कमेंट केल्या आहेत. तर काही हिंदुत्ववादी लोकांच्याही संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या पोस्टवर दिसून येत आहेत.

 

प्रभू श्री रामचंद्र यांच्या जागी शरद पवार यांचा फोटो शेअर करून त्यांचा अपमान केल्याच्या कमेंट्स करण्यात आल्या आहेत तर असेच काही संपादित फोटोही कमेंटमध्ये टाकण्यात आले आहेत. तर राणेंच्या छातीत असे किती फोटो दिसतील अशाही कमेंट करण्यात आल्या आहेत. नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे काही दिवसांपूर्वीच तृतीयपंथीयांच्या क्रोधाला बळी पडले होते. मात्र त्यांनी नंतर तृतीयपंथीयांची माफी मागितली होती. आता या पोस्ट नंतर नितेश राणे असेच काहीसे ठाकरे समर्थकांच्या क्रोधाला बळी पडले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.