Tuesday, December 9, 2025
Home Blog Page 1682

Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारातील अनेक कंपन्यांचे शेअर गेल्या काही वर्षांत मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. शेअर बाजारात अशा काही कंपन्या देखील लिस्टेड आहेत ज्या घसरणीनंतर चांगला रिटर्न देत आहेत. यामध्ये फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या IPCA Lab चा देखील समावेष आहे. दीर्घकालावधीमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न मिळवून दिला आहे. या शेअर्समध्ये अवघ्या 12,000 रुपयांची गुंतवणुक केलेल्या गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत.

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

 

मात्र सोमवार, 2 जानेवारी रोजी इप्का लॅबचे शेअर्स एका वर्षाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले आहेत. तसेच, 4 जानेवारीला कमकुवत बाजारातही यामध्ये सुमारे चार टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. बीएसईवर इंट्रा-डेमध्‍ये या शेअर्सनी 860 रुपयांची पातळी गाठली होती. दिवसअखेर तो 854.10 रुपयांवर बंद झाला. इप्का लॅबची मार्केट कॅप 21,664.86 कोटी रुपये इतकी आहे. Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year, here's how

गुंतवणूकदार झाले मालामाल

7 डिसेंबर 2001 रोजी म्हणजेच सुमारे 20 वर्षांपूर्वी IPCA लॅबच्या शेअर्सची प्रभावी किंमत फक्त 4.50 रुपये होती. मात्र आज त्याची किंमत 850 पटीने वाढून 854.10 रुपये झाली आहे. या कालावधीमध्ये फक्त 12,000 रुपयांची गुंतवणूक केलेले गुंतवणूकदारांना आज एक कोटी रुपये मिळाले असतील. Multibagger Stock

MULTIBAGGER STOCK 2021: This stock has doubled investors' money in nine trade sessions | Zee Business

एका वर्षात झाली मजबूत वाढ

हे लक्षात घ्या कि, गेल्या वर्षभरापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये कमकुवतपणा दिसून आला आहे. गेल्या वर्षी 10 जानेवारी 2022 रोजी तो 1124.40 रुपयांच्या एका वर्षातील विक्रमी उच्चांकावर होता, मात्र 2 जानेवारी 2023 पर्यंत तो 26 टक्क्यांनी घसरून 830 रुपयांवर आला आहे. यानंतर त्यामध्ये पुन्हा तीन टक्के वसुली झाली आहे. Multibagger Stock

Leading API Manufacturing Units | Global Presence | Ipca Laboratories

कंपनीबाबत जाणून घ्या

IPCA Lab हा वेदना, अँटीमलेरिया आणि हेअर केअर थेरपीमधील एक अग्रगण्य ब्रँड आहे. कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, IPCA Lab विविध रोगांसाठी 350 पेक्षा जास्त फॉर्म्युलेशन आणि 80 API तयार करते. 120 हून जास्त देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय पसरलेला आहे. यामध्ये जगभरात 15 API प्लांट आणि 11 फॉर्म्युलेशन प्लांट आहेत. IQVIA मे 2020 नुसार भारतीय फार्मास्युटिकल मार्केटमधील टॉप 300 ब्रँड्समध्ये तिचे चार फॉर्म्युलेशन आहेत.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/ipca-laboratories-ltd/ipcalab/524494/

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा

शरद पवार जाणता राजाच; भुजबळांनी कारणेही सांगितली

chhagan bhujbal sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे जाणता राजाच आहेत. त्यात चूक काय? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवारांना आपण जाणता राजा का म्हणतो याची कारणेही सांगितली. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जानता राजा म्हणजे काय? तर लोकांचे प्रश्न समजून घेऊन जो हे प्रश्न सोडवतो. जनतेशी एकरूप होतो त्याला जानता राजा म्हणतात. शरद पवार हे राजकारणातून चार वेळा मुख्यमंत्री झाले. देशभरात इतर पदेही भूषविली. त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडवले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. पुणे, नाशिक, मुंबईमध्ये 80 टक्के ऑटोमाबाइल्सचे कारखाने पवार साहेबानी आणले. उद्योगधंदा वाढवला. मी त्याला साक्ष आहे असं भुजबळ म्हणाले.

शरद पवारांनी महिलांचे प्रश्न सोडवले. सत्ता गेली तरी बेहत्तर परंतु त्यांनी न घाबरता मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं. यालाच जाणता राजा म्हणतात. जो जनतेमध्ये एकरूप होऊन त्यांचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणतात. त्यामुळे आम्ही शरद पवारांना जाणता राजा म्हणतो . तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा किंवा नका म्हणू, असं भुजबळ म्हणाले.

IND VS SL : संघ बदलला पण भारताची ‘ती’ सवय नाही बदलली; असंच राहिल्यास आज होऊ शकतो पराभव

IND VS SL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ष बदललं, भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) आपला संघही बदलला, कर्णधार बदलला पण आपली जुनी सवय मात्र टीम इंडिया बदलू शकली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या (IND VS SL) पहिल्या T-20 सामन्यात कसाबसा विजय मिळवला. मात्र असच सुरु राहील तर आजच्या दुसऱ्या T-20 सामन्यात मात्र भारतीय संघाला पराभवाची चव चाखावी लागू शकते.

कोणती आहे ती सवय –

खरं तर आपण अनेक वर्षांपासून पाहत आलो कि जेव्हा जेव्हा भारताचे आघाडीचे फलंदाज (Top Order Batsman) लवकर बाद होतात तेव्हा तेव्हा मधल्या फळीतील (Middle Order) फलंदाजांवर दडपण येत आणि त्यातच ते सुद्धा बाद होतात. यापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन लवकर बाद झाले तर भारताची फलंदाजी पूर्णपणे कोसळत होती. आता सुद्धा नवे सलामीवीर आले, मधल्या फळीत नवे फलंदाज आले मात्र जुनी सवय काय बदलायचं नाव घेईना. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T-20 सामन्यात पण हेच घडलं. तिथे भारताची टॉप ऑर्डर अपयशी ठरली, तेव्हा संघावरील दडपण स्पष्टपणे दिसत होते. परिणामी 14.1 षटकात अवघ्या 92 धावांत निम्मा संघ डगआऊटवर परतला.

केवळ श्रीलंकन फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताने अखेरच्या षटकात कसाबसा विजय मिळवला. नाहीतर वानखेडेवर 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे ही काही मोठी गोष्ट नाही. मुंबईत आपण कसातरी विजय मिळवला हे खरं आहे. मात्र असच सुरु राहील आणि भारतीय बॅटिंग ऑर्डर पुन्हा गडगडली तर आजच्या पुण्यातील दुसऱ्या T-20 सामन्यात मात्र भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी अर्ज भरा

Jawahar Navodaya Vidyalaya Satara

सातारा | जवाहर नवोदय विद्यालय सातारा 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी प्रवेशाकरिता निवड परीक्षेसाठी दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी विद्यार्थ्यांनी त्वरीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्या ॲन्सी ए. जे. यांनी केले आहे.

या परीक्षेसाठी पात्रता पुढीलप्रमाणे राहील. सातारा जिल्ह्यातील शासनमान्य शाळेमध्ये विद्यार्थी इयत्ता पाचवी मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये शिकत असावा. विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2011 पूर्वी व 30 एप्रिल 2013 नंतर झालेला नसावा. ही अट सर्वांसाठी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाही लागू आहे. सन 2020-21, 2021-22, 2022-23 मध्ये विद्यार्थी तिसरी, चौथी, पाचवी अनुक्रमे खंड न पडता उत्तीर्ण झाला पाहिजे. अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, अपंग संवर्गासाठी व इतर मागास वर्गासाठी जागा राखीव आहेत. तसेच तृतियपंथीय उमेदवारसुध्दा नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी अर्ज करु शकतात. विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक. जर आधार क्रमांक नसेल तर पालकांचे जिल्ह्यातील रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

नवोदय निवडीसाठी परीक्षा शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.30 वा. होईल. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेतून सोपी केली आहे. प्रवेश चाचणी परीक्षा 2023 साठी डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅबद्वारे http://navodaya.gov.in या वेबसाईटवरती लिंक उपलब्ध आहे.

Train Cancelled : रेल्वेकडून 337 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट

Train Cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : वातावरणातील दाट धुक्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. धुक्यामुळे व्हिजिबिलिटी खूपच कमी झाली आहे. ज्यामुळे, रेल्वेने आज (5 जानेवारी रोजी) 337 गाड्या रद्द केल्या आहेत. काल देखील रेल्वेकडून 306 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. धुक्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या आज उशिराने धावत आहेत. Train Cancelled

Indian Railway: दिल्ली-एनसीआर के लाखों यात्रियों के लिए खुशखबरी, रेलवे चलाने जा रहा 28 लोकल ट्रेनें, जान लें समय और किराया - Indian Railway Good News Good news for lakhs ...

रेल्वेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, रेल्वेकडून आज 293 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत तर 40 गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय 17 गाड्यांचे वेळापत्रक बदलले असून इतर 19 गाड्यांचे मार्गही इतरस्त्र वळवण्यात आहेत. रेल्वे वेळोवेळी रद्द झालेल्या गाड्यांची यादी अपडेट करत असते. त्यामुळे रद्द झालेल्या गाड्यांच्या संख्येत बदल होऊ शकतो. Train Cancelled

How Indian Railways Is Leading The Way In Reducing The Nation's Carbon Footprint

ट्रेनचे स्टेट्स ऑनलाइन तपासा

रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती ऑनलाइन पुरवली जाते. रेल्वेच्या रद्द, रिशेडयूल आणि डायव्हर्ट केलेल्या गाड्यांची माहिती भारतीय रेल्वे आणि IRCTC च्या वेबसाइटवर उपलब्ध असते. तसेच रद्द झालेल्या गाड्यांची माहिती NTES या App वरूनही घेता येईल. रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटवर किंवा IRCTC च्या https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 या वेबसाइटवर जाऊन कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स तपासता येते. Train Cancelled

Planning a train trip? Railway Ministry urges to follow state-wise guidelines | Times of India Travel

रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट अशा प्रकारे चेक करा

IRCTC आणि नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम या दोघांकडून दररोज रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे आता घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट तपासता येईल. यासाठी सर्वांत आधी https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, Exceptional Trains च्या पर्यायावर क्लिक केल्यावर रद्द केलेल्या तसेच रीशेड्यूल आणि डायवर्ट केलेल्या गाड्यांची लिस्ट मिळेल. Train Cancelled

रेल्वेमधील नोकरी विषयक माहितीकरता इथे भेट द्या : Railway Recruitment 

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा

 

लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे…; अजित पवारांनी टिल्ल्या म्हणताच राणेंची जहरी टीका

Nitesh rane ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विधानावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. याबाबत विचारलं असताना अजितदादांनी नितेश राणेंचा उल्लेख टिल्ल्या असा केला होता. त्यांनतर राणेंनी पुन्हा एकदा ट्विट करत अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले आहे. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली असा पलटवार त्यांनी केला आहे.

नितेश राणेंनी ट्विट करत म्हंटल की, लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले आहे. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली. तसेच हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टीका सहन होत नाही. त्यामुळेच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

अजितदादा नेमकं काय म्हणाले होते-

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षकहोते असं विधान अजित पवार यांनी केल्यांनतर भाजपाकडून अनेक ठिकाणी आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली. यावेळी नितेश राणे यांनी सुद्धा होय आम्ही, हिंदवी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार. मी ही गोष्ट धरणवीर अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगत आहे असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता. त्याबाबत अजित पवारांना विचारलं असता टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ? त्यांना उत्तर आमचे इतर प्रवक्ते देतील, असं प्रत्युत्तर त्यांनी दिले.

भाजप आ. जयकुमार गोरेंना रूग्णालयातून डिस्चार्ज

Jayakumar Gore

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आ. जयकुमार गोरे यांना आज पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 12-13 दिवसापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. सातारा जिल्ह्यातील मलठण (ता. फलटण) येथे त्याचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर आज 5 जानेवारी रोजी सकाळी त्यांना डाॅक्टरांनी डिस्जार्च दिला आहे. हेलिकॅप्टरने आ. जयकुमार गोरे पुण्याहून आपल्या मूळगावी बोराटवाडी (ता. माण) कडे रवाना झाले.

आ. जयकुमार गोरे यांचा 24 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला होता. पुणे- पंढरपूर मार्गावरील मलठण येथील स्मशानभूमीजवळील पुलावरून जवळपास 30 फूट चारचाकी गाडी खोल खड्ड्यात कोसळली होती. त्यानंतर त्यांना बारामती व नंतर पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. या अपघातात अंगरक्षक, गाडी ड्रायव्हर गंभीर जखमी झाले होते.

https://www.facebook.com/JaykumarGoreSpeaks/videos/1007992060041607

आज रुग्णालयातील डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे उपचार केला. त्याबद्दल त्या सर्वांचे आ. जयकुमार गोरे यांनी आभार मानले. तत्पूर्वी आज सकाळी देशाचे रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आज पुण्यातील रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, या अपघातातील जखमी रुपेश साळुंखे याची रुबी रुग्णालयात ट्रीटमेंट चालू आहे. काल आ. जयकुमार गोरे यांनी रुपेशची भेट घेतली. त्याच्या तब्येतीची विचारपूस केली.

Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, पहा आजची नवीन किंमत

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज भारतीय वायदे बाजारात सोने महागले असून चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याचे दिसून येत आहे. या महिन्यात आतापर्यंत सोन्याचा भाव 758 रुपयांनी वाढला आहे. आज (5 जानेवारी रोजी) मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.19 टक्क्यांनी वाढून ट्रेड करत आहे. आज चांदीचा भाव 0.08 टक्क्यांनी घसरला असून 70 हजार प्रति किलोच्या खाली आला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.48 टक्क्यांनी वाढून बंद झाला होता. त्याच वेळी, चांदीचा दर 0.88 टक्क्यांनी घसरला आणि बंद झाला. Gold Price Today

Gold prices crash today, plunge to 4-month low, silver rates slump | Mint

आज फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किंमतीपासून सकाळी 09:25 पर्यंत 108 रुपयांनी वाढून 55,875 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज सोन्याचा भाव 55,794 रुपये झाला. आज, MCX वर चांदीची किंमत रेड मार्कवर ट्रेड करत आहे. आज चांदीचा दर आज 53 रुपयांनी घसरून 69,265 रुपये प्रतिकिलो झाला आहे. चांदीचा भाव आज 69,330 रुपयांवर उघडला. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर वाढला असला तरी चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस आज 1.04 टक्क्यांनी वाढून 1,856.14 डॉलर प्रति औंसतर चांदीची स्पॉट प्राईस 0.92 टक्क्यांनी घसरून 23.75 डॉलर प्रति औंस झाली. Gold Price Today

Today gold rate in Mysore 12th January 2021

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,960 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,960 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,960 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता

छोटा पॅक बडा धमाका! BSNL 19 रुपयांमध्ये देत आहे 90 दिवसांची वैलिडिटी

BSNL

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरपैकी एक आहे. याशिवाय रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्ही देखील या यादीचा भाग आहेत. या कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांना अनेक उत्तम रिचार्ज ऑफर देत असतात. आज आम्ही तुम्हाला BSNLच्या अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्याने या सर्व टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकले आहे. होय, आम्ही BSNLच्या 19 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलत आहोत. जे तुम्हाला 90 दिवसांची वैधता देते. त्याबद्दल जाणून घेऊया.

BSNLचा 19 रुपयांचा प्लॅन
BSNLचा हा प्लॅन नॉर्थ ईस्ट झोनसाठी आणण्यात आला होता. ज्याची किंमत 19 रुपये आहे आणि त्याची वैधता 90 दिवस आहे. फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 20 मिनिटांचा कॉलिंग वेळ मिळेल, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणताही डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग फीचर मिळत नाही.

हे ऑपरेटर 20 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या योजना देखील देतात
BSNL व्यतिरिक्त, Jio, Airtel आणि Vi देखील असे रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. जर आपण रिलायन्स जिओबद्दल बोललो तर कंपनी तुम्हाला 15 रुपयांचा रिचार्ज प्लान ऑफर करते. ही एक बूस्टर योजना आहे, जी तुमच्या सध्याच्या प्लॅनप्रमाणेच वैधतेसह येते. यामध्ये तुम्हाला 1GB डेटा दिला जातो. कृपया सांगा की ही योजना तेव्हाच कार्य करेल जेव्हा तुमच्याकडे आधीपासूनच सक्रिय योजना असेल. ही योजना मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक देखील असू शकते.

दुसरीकडे, जर आपण Airtel आणि Vi बद्दल बोललो, तर हे दोन्ही ऑपरेटर फक्त 19 रुपयांचा प्लॅन ऑफर करतात, जे 1 दिवसाची वैधता देते. याशिवाय तुम्हाला 1GB डेटा दिला जातो.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

पोलिसांच्या 9 PCR वैन, 5-6 कॉल… तरीदेखील आरोपींनी मुलीला 13 किलोमीटरपर्यंत ओढत नेले

PCR Van

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील कांझावाला भागात 1 जानेवारी रोजी एका 20 वर्षीय तरुणीवर झालेल्या हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपीने आधी स्कूटीवरून जाणाऱ्या मुलीला धडक दिली आणि नंतर 2-3 वेळा कार पुढे-मागे करून मुलीला चिरडले, असे सांगण्यात येते. तरुणी गाडीखाली अडकल्याचे कारमधील तरुणांना माहीत होते, मात्र त्यानंतरही त्यांनी गाडी चालवणे सुरूच ठेवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनीनुसार, 9 पोलिस नियंत्रण कक्ष (PCR) व्हॅनने कारचा पाठलाग केला परंतु ते त्या कारला पकडण्यात अयशस्वी झाले.

नवीन वर्षाची पार्टी आटोपून आपल्या मैत्रिणी निधीसोबत स्कूटीवरून घरी परतणाऱ्या अंजली सिंगला पहाटे दोनच्या सुमारास कारने धडक दिली. यानंतर तिचा पाय गाडीच्या एक्सलेटरमध्ये अडकला. रिपोर्ट्सनुसार, मुलगी ओरडत आणि रडत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिली, पण कारमध्ये बसलेल्या तरुणांनी तिला 13 किमीपर्यंत ओढले. कारमध्ये काहीतरी अडकल्याचे आरोपींना वाटले. त्याने बाहेर पाहिले असता त्याला मुलीचा हात दिसला, मात्र वाटेत एक पीसीआर व्हॅन (PCR) उभी असल्याचे पाहून त्याने पुन्हा मुलीला ओढण्यास सुरुवात केली. मुलीचा मृतदेह खाली टाकण्यासाठी कारने 4 पेक्षा जास्त वेळा यू-टर्न मारला. या वेदनादायक घटनेदरम्यान, कार चार पोलिस स्टेशन हद्दीतून, सुलतानपुरी, अमन विहार, प्रेम नगर आणि कांजवाला पोलिस स्टेशन परिसरातून गेली होती. अपघाताच्या वेळी अंजलीची मैत्रिण निधी ही अंजलीच्यासोबत स्कूटीवर होती, मात्र तिच्या मैत्रिणीची अवस्था पाहून ती कोणालाही न सांगता तिच्या घरी पळून गेली. सीसीटीव्हीद्वारे पोलिसांना तिचा शोध लागेपर्यंत निधी पुढे आली नाही.

अपघाताच्या 13 किलोमीटरच्या मार्गावर 5 पीसीआर व्हॅन उभ्या होत्या, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 5-6 पीसीआर कॉल करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी दीपकशी 20 हून अधिक वेळा बोलले. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी एकूण 9 पीसीआर व्हॅन तैनात करण्यात आल्या होत्या आणि स्थानिक पोलीसही आरोपींचा शोध घेत होते, मात्र तरीही दिल्ली पोलिसांना आरोपींना घटनास्थळावरून पकडता आले नाही.

पहिला पीसीआर (PCR) कॉल रात्री 2:18 वाजता आला, ज्यामध्ये एका व्यक्तीने अपघाताबद्दल सांगितले. 2:20 ला आलेला दुसरा पीसीआर कॉल देखील अपघाताबद्दल होता. त्यानंतर रात्री 3.24 च्या सुमारास दीपकने 2 पीसीआर (PCR) कॉल केले, त्यांनी सांगितले की, कारमध्ये कोणाचा तरी मृतदेह लटकत आहे.

त्यानंतर 4:26 आणि 4:27 वाजता साहिल नावाच्या व्यक्तीने दोन पीसीआर कॉल केले आणि सांगितले की एका महिलेचा मृतदेह रस्त्यावर पडला आहे. त्या मार्गावर एकूण 5 पीसीआर व्हॅन (PCR) होत्या परंतु गंभीर कॉल पाहता एकूण 9 पीसीआर व्हॅन तैनात करण्यात आल्या होत्या परंतु पीसीआर कार आरोपींना शोधू शकली नाही कारण रात्री धुके असल्याचा दावा केला जात आहे आणि पीसीआर पोहोचण्यापूर्वीच कार निघून गेली होती. यासंदर्भातील अहवाल दिल्ली पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती