कोरोना काळातही बिनधास्त पाणीपुरी खाता येणार; आले ATM सारखे पाणीपुरी मशिन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाणीपुरी हा भारतातील सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. भलेही त्याची नावे वेगवेगळी असतील मात्र तो सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. कित्येक लोक पाणीपुरीचे दिवाने असतात. संचारबंदीच्या काळात या खाद्यपदार्थाची सर्वानी खूप आठवण काढली आहे. सध्या देशातील कोरोना स्थिती आणि कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजी यामुळे रस्त्यावरील पदार्थ खाण्यास लोक घाबरत आहेत. पण आता चक्क पाणीपुरीचे मशीनच आले आहे.

हे मशीन अगदी एटीएम मधून पैसे काढावेत तशी पाणीपुरी देते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ या पाणीपुरी मशीनचा आहे. नवीन नॉर्मल मध्ये असे अनेक बदल होणार आहेत असेही हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या ह्रदयी सिंग यांनी म्हंटले आहे. गोल गप्पा, बतासा, पुचका याला काहीही म्हणा असे म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो सर्वत्र व्हायरल होतो आहे.

 

या मशीनला ऑटो पाणीपुरी सेंटर असे म्हंटले आहे. या मशीन मध्ये २० रुपयाची नोट ठेवली की पाणीपुरी बाहेर येते असे हे मशीन बनविणाऱ्याने सांगितले आहे. हे मशीन बनवायला या व्यक्तीला सहा महिने लागले असल्याचे त्याने सांगितले आहे. या मशीनची सर्व सिस्टीम ही  एटीएम मशीन सारखी आहे. केवळ एटीएम मध्ये कार्ड घालतो त्याजागी इथे नोट घालावी लागणार आहे. या सृजनात्मक मशीनसाठी या व्यक्तीचे कौतुक होते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment