हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयन राजे भोसले यांनी बंधू शिवेंद्रराजे भोसले यांची मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल विचारले असता त्यांनी ज्यांनी कुणी कोणावर टीका केली ते त्यांचं त्यांना विचारा माझा काय संबंध? असे उत्तर दिले. माझा यात काय संबंध, मी माझे परखडपणे मत मांडत असतो ज्यांनी टीका केली ते मला विचारून टीका करतात की जे उत्तर देणार ते मला विचारून देतात का? त्यांचं त्यांना विचारा असे ते आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये म्हणाले आहेत.
भाजप नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले नेहमीच त्यांच्या विशेष स्टाईल आणि परखड विधानांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी त्यांच्या विशेष संतांची मध्ये उत्तर दिले आहे. यावेळी त्यांना कोरोना संदर्भात प्रश्न विचारला असता, कोरोना हा काही विषाणूंपैकी एक विषाणू असून त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. असे सांगितले. ते म्हणाले की कित्येकांना होऊन गेला असेल पण त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीने त्यावर मात देखील केली असेल. विनाकारण लोकांना घाबरवू नका, संचारबंदी उपाय काही नाही. वस्तुस्थिती समजून घ्या असेही ते म्हणाले. तसेच जेवढे लोक कोरोनाने मृत झाले आहेत त्यापेक्षा अधिक लोक रस्ते अपघातात जातात. त्यामुळे त्याचा बाऊ करण्याची गरज नाही असे ते म्हणाले.
सगळी रुग्णालये कोरोनामुळे भरली असल्याने डायलिसिस हार्ट पेशंट लोकांनी जायचे कुठे? हा प्रश्न विचारत तुम्ही हा आजार कधी जाईल हे सांगू शकत नाही असे म्हंटले. सर्व काळजी घेतली तर कामकाज सुरु करण्यात काही अडचण नाही असेही ते म्हणाले. आषाढी एकादशीला जाणार आहात का विचारले असता, मला जायचे होते मात्र शासकीय नियमांमुळे जाता येणार नाही. मी विठुरायाकडे ‘कोणतेही राजकारण न करता सर्वानी एकत्र येऊन लोकांचा विचार करावा, यातून एखादा मार्ग निघावा, राज्यपातळीवर एखादा निर्णय घेतला जावा’ असे साकडे घालणार होतो असे त्यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.