सोलापूर | जिल्ह्यातील पेनूर येथील नागनाथ मंदिराजवळ चंदनाची खरेदीविक्री चालू असताना मोहोळ पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 34 लाख रुपये किमतीच्या चंदनासह एकुण 2 लाख 85 हजार किमतीचा इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा मोहोळ करत आहे.
दरम्यान पोलिसांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मोहोळ येथील मौजे पेनुर नागनाथ मंदिराजवळ चंदनाची खरेदी विक्री चालु आहे. प्राप्त परिस्थितीनुसार स्थानिक मोहोळ पोलिसांची मदत घेऊन माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन त्याठिकाणी खरेदीविक्री करीत असलेल्या तीन इसमांना गराडा घालुन जागीच पकडले.
या तीन इसमांच्या कब्जात 2,34,000 रुपये किंमतीचे सुगंधी चंदनाच्या 23 किलो 400 ग्रॅम लाकडाचे तुकडे, 50,000 रुपये किंमतीची मोटारसायकल , 1000 रुपये किंमतीची तराजू व वजने, 200 रुपये किंमतीची तीन लोखंडी कुदळी असा एकुण 2,85,200 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला आहे. गुन्हयातील तिन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून आरोपी व मुद्देमाल मोहोळ पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रवींद्र मांजरे, सहा. पोउपनि ख्वाजा मुजावर, पो हवा नारायण गोलेकर, पो हवा धनाजी गाडे, पो शि धनराज गायकवाड, पो शि अक्षय दळवी, चापोशि समीर शेख मोहोळ पो स्टे चे सहा. पोउपनि शिंदे, पो शि दळवी यांच्या पथकाने केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”