हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मार्चमध्ये, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण या पॅकेजअंतर्गत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली. याअंतर्गत, ज्या गरीब कुटुंबांकडे रेशनकार्ड आहे आणि ज्यांच्याकडे नाही, अशा सर्वाना एप्रिलपासून दरमहा 5 किलो गहू / तांदूळ आणि दरमहा एक किलो हरभरा मोफत देण्यात येत आहे. हे मोफत धान्य सध्या रेशन कार्डावर मिळत असलेल्या धान्याच्या कोट्या व्यतिरिक्त आहे. आता पंतप्रधानांनी यासाठी 31 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. याबरोबरच सरकारने ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ ही योजना देखील सुरू केली आहे. या यिजनेत आपल्या रेशन कार्डला आधारशी जोडण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै करण्यात आली आहे. यानंतर, रेशन कार्ड आधारशी लिंक न केल्यास लाभार्थीला पीडीएसकडून स्वस्त रेशन मिळणार नाही.
यासाठी काय करावे लागेल-आपले रेशन कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी ई-मित्र, पटवारी आणि ग्रामसचिव यांना अधिकृत केले गेले आहे. आपण या सर्वांकडून मदत घेऊ शकता. याशिवाय आपण स्वतःदेखील आपले रेशनकार्ड आधारला लिंक करू शकता.
आपण रेशनकार्डला आधार कार्डशी या प्रकारे लिंक करू शकता
स्टेप -1: रेशनकार्डला आधारशी जोडण्यासाठी यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्या.
स्टेप 2: यानंतर ‘Start Now’ ऑप्शनवर क्लिक करा. त्यात पूर्ण पत्ता भरा. सर्व पर्यायांमधून ‘रेशन कार्ड’ लाभ प्रकार निवडा.
स्टेप 3: त्यानंतर रेशन कार्ड योजना निवडा, रेशन कार्ड नंबर, आधार क्रमांक, ई-मेल पत्ता आणि मोबाइल नंबर यासारख्या डिटेल्स भरा. यानंतर, आपल्या रजिस्टर्ड मोबाइलवर आलेला वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) भरा.
स्टेप 4: नंतर स्क्रीनवर आलेल्या प्रक्रिया पूर्ण झाल्याची नोटिफिकेशन पोस्ट करा.
स्टेप 5: या अर्जाचे वेरिफिकेशन झाल्यानंतर रेशनकार्डला आधारशी जोडले जाईल. 1 जूनपासून 2020 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा लागू करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 जून रोजी देशाला संबोधित करताना सांगितले की, आता नोव्हेंबरपर्यंत देशातील सुमारे 80 कोटी गरीब लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळेल. या योजनेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करीत आहे, मात्र धान्य वितरण हे राज्य सरकार करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.