हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये असा एक भयंकर अपघात घडला आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. रशियाच्या चेल्याबिन्स्कमधील उरल महामार्गावर वेगाने आलेल्या ट्रकने आपला कंट्रोल गमावला आणि पुढे धावणाऱ्या डझनभर गाड्यांना चिरडले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 2 लोकांचा जागीच मृत्यू झाला तर 7 लोक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
आरटीच्या वृत्तानुसार, ही भयानक घटना एम -5 च्या उरल महामार्गावर 16 जून रोजी घडली. ट्रक चालकाच्या म्हणण्यानुसार तो खूप वेगाने ड्राईव्ह करत होता त्याचा ताबा केव्हा सुटला हे त्यालाही कळलेच नाही. त्याने सांगितले की, तो ब्रेक लावू शकला नाही आणि हा अपघात झाला. ट्रक चालकाच्या म्हणण्यानुसार, पुढे ट्रॅफिक जाम आहे हे त्याला ठाऊक नव्हते, रस्ता रिकामाच आहे असा त्याचा विचार होता आणि त्यामुळे तो ट्रक खूप वेगात चालवत होता.
सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली घटना
महामार्गावर पाळत ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की या ट्रकचालकाने बिलकुलच ब्रेक लावले नाहीत आणि समोर उभे असलेल्या अनेक वाहनांना चिरडले. या घटनेत 5 कार आणि इतरही अनेक सार्वजनिक वाहनांचेही नुकसान झाले आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, बर्याच मोटारी ट्रकच्या तावडीत सापडल्या आहेत. पोलिसांनी ट्रक चालकास अटक केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.