बंद फ्लॅटमध्ये उच्चशिक्षित तरुणीचा बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

मूळ बीडची असलेली ३० वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृतदेह सिंहगड रोडवरील माणिकबाग भागात असलेल्या एका बंद फ्लॅटमध्ये आढळला. तरुणीच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा सापडल्याने तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराला वाचवतांना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

ड्रेनेज लाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात वरून मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने सात मजूर दबले गेले होते. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या तीन अग्निशामक जवानांच्या अंगावरही मातीचा ढिगारा पडल्याने गाडले गेले. या घटनेत अग्निशमन दलाच्या जवानासह एका मजुराचा मृत्यू झाला आहे. सदर दुर्घटना दापोडी येथे रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

मतदान केंद्र शोधताय? गूगल करा..

लोकसभा निवडणुकीत पुण्यामध्ये निचांकी मतदान झाल्याचा कटू अनुभव असल्याने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा प्रथमच मतदान केंद्रे ही ‘गुगल टॅग’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना घराजवळची मतदान केंद्रे समजू शकणार आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांना गुगल मॅपमध्ये टॅग करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्र कोठे आहे; तसेच किती अंतरावर आहे, हे समजणार आहे.

चंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुड मधून लढणार विधानसभा?

पुणे प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुड येथून विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचं समजत आहे. काँग्रेस पाठोपाठ भाजप देखील काही वेळातच आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. भाजप कडून कोथरुड मधून चंद्रकांतदादा पाटील तर कसबा मतदार संघातून मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं बोललं जात आहे. शिवाजी … Read more

अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत

पुणे प्रतिनिधी। पाण्याचा लोट पर्वती भागातील मित्र मंडळ चौकाजवळ असलेल्या आनंदी बंगल्यात शिरला. पाण्याचा वेग पाहता बंगल्यातून बाहेर पडणे शक्य झाले नव्हते. अशा परिस्थितीत बंगल्यात राहणारे नातू कुटुंबीयांच्या दृष्टीने अग्निशमन दलाचे जवान देवदूत ठरले. दहा महिन्यांच्या बालकासह पाच जणांची सुटका जवानांनी केली. मित्रमंडळ चौकात आनंदी बंगल्यात पाणी शिरल्याची माहिती बुधवारी रात्री जवानांना मिळाली. बंगल्यात दहा … Read more

पुण्यात पावसाचा कहर, पाच जणांचा बळी ; शाळा महाविद्यालये यांना आज सुट्टी

पुणे प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या पावसाने काल बुधवारी रात्री रूद्र रूप धारण करुन पुणेकरांची झोपच उडवली. काल रात्री पावसाचा जोर वाढत जात असल्यामुळे नागरिकांनी कालची रात्र भीतिदायक अवस्थेमध्ये जागून काढली. कालच्या पावसाच्या सर्वाधिक फटका हा अरण्येश्वर परिसर , कात्रज परिसर आणि सहकार नगर येथील भागांना बसला. येथे रस्त्यांवर पाण्याचा प्रवाह हा … Read more

पुणे परिसरात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग

पुणे प्रतिनिधी। पुणे शहरात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून गेल्या तीन तासांपासून पुणे शहर व अन्य उपनगरांमध्ये देखिल मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार कोसळणाऱ्या सरींमुळे शहरात अनेक भागात रस्त्यांवर पाणी वाहत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भासह मराठवाड्यात सर्वदूर पावसाचे अंदाज असून अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात … Read more

अवघ्या नऊ मिनिटात पिला तब्बल ‘४५ कप चहा’

पुणे प्रतिनिधी | पैज शब्दातच आव्हान आहे अनेक जण हा पैजेचा विडा उचलण्यासाठी जीवावर उदार आणि बेभान ही होतात. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील मित्रांमध्ये लागलेली अशीच एक अनोखी पैज सध्या सर्वच सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. गप्पा मारताना मित्रांनी लावलेली एक हजार रुपयांची पैज जिंकण्यासाठी एका युवकाने ९ मिनिटात ४५ चहा पिऊन टाकून एक अजब … Read more

अर्थमंत्री सीतारमन यांचे ‘ते’ वक्तव्य बेजबाबदारपणाचे – पृथ्वीराज चव्हाण  

पुणे प्रतिनिधी  |‘प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे’ वक्तव्य गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी केलेल वक्तव्य हे बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ओला उबर चे नाव पुढे केले जात … Read more

अतिवृष्टीचा पाऊस पुणे जिल्ह्यात या तालुक्यातील शाळा कॉलेज उद्या राहणार बंद

पुणे प्रतिनिधी | पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पुण्यात अंशतः पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मागील दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यातील शाळा कॉलेज बंद ठेवली होती. तर उद्या देखील अतिवृष्टीची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काही तालुक्यातील शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निर्णय जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यात … Read more