उदयनराजेंनी केलं तेलंगणा पोलिस दलाचे या शब्दांत अभिनंदन

मागील काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून त्या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. हा क्रूरतेचा कळस जेंव्हा उघडकीस आला त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी चक्र फिरवत तातडीने आरोपींना अटक केली होती. मात्र आता  या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे.

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

 सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

लोकसभा पोटनिवडणूकीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर सांगता सभेत यांनी मुस्लिम समुदायाला भडकवणारी आणि त्यांची निंदानालस्ती करणारी भाषा वापरल्यामुळे याचा फटका उदयनराजेंना निवडणुकीत बसला. वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाज कमालीचा दुखावला गेला होता.

निवडणूक निकालानंतर ही बातमी उदयनराजेंना समजल्यानंतर मुस्लिम समुदायाची माफी मागण्यासाठी आज पहिल्यांदाच कराडमध्ये गेले होते. विक्रम पावसकर यांना चांगलाच धडा शिकवा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. मी त्या ठिकाणी असतो तर पावसकरांना सभेतून खाली खेचलं असतं असं उदयनराजे म्हणाले. याशिवाय माझ्या प्रचारात त्यांना मी कोणताच रोल दिला नव्हता मात्र सांगता सभेत त्यांनी वादग्रस्त भाषण करून संपूर्ण कामावर विरजण घातलं असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

श्रीनिवास पाटील यांचा नावलौकिक वाढेल असं काम सातरकरांनी करावं असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मी जर गुंड, मवाली असतो तर लोकांनी मला मुलासारखं सांभाळलं नसतं. माझ्याकडून झालेल्या चुकांची मी माफी मागतो असं म्हणत अधिक चांगलं काम करण्यासाठी मला ताकद द्या असं भावनिक आवाहनही उदयनराजे यांनी यावेळी केलं.

पहा विडिओ- 

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

गडकिल्यांवर लग्न सोहळ्याप्रकरणी उदयनराजेंचा खुलासा

‘मला काय वेड लागले आहे का गड किल्यावर डांन्सबार सुरु करा असं सांगायला. असा विचार करण्यापेक्षा मला मेलेले परवडले. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे आणि यातून माझे चारित्र्यहनन केले’ असा आरोप सातारा लोकसभा पोटनिवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले उदयनराजे भोसले यांनी केला.

उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

उदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत २ लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

अतुल भोसलेंना एकदा आमदार तर करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता बनवेल – अमित शहा

‘अतुल भोसले ना एकदा आमदार करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता करेन’ असे ठोस आश्वासन केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कराड येथे दिले. सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जाहीर प्रचार सभेत शहा बोलत होते. यावेळी दोन्ही मतदारसंघांचे उमेदवार उदयनराजे आणि अतुल भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची अमित शहा यांनी उपस्थित लोकांना विनंती केली.

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

सतारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या साताऱ्यात राष्ट्रवादीला गळती काय थांबता थांबत नाही . राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेत अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून १४ सप्टेंबरला दिल्लीत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीला सोडचिठी देण्याच्या मानसिकतेत असलेले सातारचे खासदार उदयनराजे … Read more