कृपया झुंबड करू नका! राज्यात ६ महिने पुरेल इतका अन्नधान्य पुरवठा- छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी बाजारात नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. त्यामुळं करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन भाजी बाजार, किराणा दुकानात झुंबड करू नका असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला केलं … Read more

करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोना व्हायरसचा संसर्ग जलद गतीने वाढत असून करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पर्यंत पोहोचली आहे. या आजाराने देशभरात ९ जणांचा बळी घेतला आहे. जगभरात तर या व्हायरसचामुळे आतापर्यंत १६ हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात साडेतीन लाखापेक्षा जास्त … Read more

करोनापासून स्वतःला वाचवायचंय, तर ‘या’ गोष्टी नक्कीच करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाविरुद्धची लढाई आता एका निर्णयक टप्प्यावर आली आहे. आणि या टप्प्यावर आपल्याला पूर्ण क्षमतेने या कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातच राहण्याची गरज आहे. मात्र, घरी राहून सुद्धा तुम्हाला काही गोष्टींमध्ये अतिदक्षता पाळायची गरज आहे. जेणेकरून करोनापासून तुम्हाला तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा बचाव करता येईल. अशाच काही … Read more

काळजी नका करू! संचारबंदीत ‘या’ गोष्टी राहणार सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचललं आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याचसोबत जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर … Read more

शरद पवार म्हणाले करोनाविरुद्धची लढाई आपण जिंकू, परंतु..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ … Read more

मोदींच्या आवाहनाला शरद पवारांनी असा दिला प्रतिसाद, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणू विरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या … Read more

करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी कोल्हापूर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नेमून दिलेली जबाबदारी सर्व विभाग प्रमुखांनी सक्षमपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात विविध विभाग प्रमुखांची जिल्हाधिकारी देसाई यांनी बैठक घेवून नेमून दिलेल्या जबाबदारीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. याबैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. … Read more

वॉर अगेन्स्ट व्हायरस असल्याने रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊन नका!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोना व्हायरसचा संसर्गाची प्रकरण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून संबोधन केलं. आपण एका विषाणू सोबत जागतिक युद्ध लढत आहोत तेव्हा एकजुटीनं लढण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा, सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नका, सरकारने दिलेल्या सूचना पाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील … Read more

खबरदारी! पुण्यातील सर्व रेस्तराँ, परमीट रूम, बार, क्लब ३१ मार्चपर्यंत बंदचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरवात केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हद्दीतील सर्व परमीट रूम, बार आणि रेस्टॉरंट, क्लब ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 तसेच … Read more

राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका असं आवाहनही … Read more