१३० वर्षात प्रथमच मुंबईच्या डब्बेवाल्यांनी १० दिवस सेवा ठेवली बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला घरातच थांबण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, … Read more

सिंगापूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे आले धावून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात करोनाने थैमान घातलं असून फिलिपाईन्समध्ये शिक्षण घेणारे ३० भारतीय विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे सरसावले आहेत. उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात आहेत. ३० जणांच्या या गटामध्ये काही विद्यार्थी हे डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंगापूरमध्ये … Read more

राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा ‘अब तक ४७’; आणखी दोघांना संसर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडली आहे. त्यामुळे करोनाग्रस्तांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे. मुंबई आणि उल्हासनगरमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. या करोनाबाधित रुग्णावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला आहे. … Read more

वॉर अगेन्स्ट व्हायरस असल्याने रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊन नका!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोना व्हायरसचा संसर्गाची प्रकरण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून संबोधन केलं. आपण एका विषाणू सोबत जागतिक युद्ध लढत आहोत तेव्हा एकजुटीनं लढण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा, सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नका, सरकारने दिलेल्या सूचना पाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील … Read more

दक्षता! केवळ १ रुपयात थर्मल स्क्रिनिंगद्वारे करा तापाची चाचणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोना व्हायरसची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. हे पाहता भारतीय रेल्वेने स्थानकांवरील प्रवाशांसाठी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था केली आहे. रेल्वे प्रवासी फक्त १ रुपये शुल्क देऊन थर्मल स्क्रिनिंगद्वारे ताप तपासू शकतील. रेल्वे प्रशासनाने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रवाशांना ही सोय उपलब्ध करून दिली आहे. मुंबईतील १९ रेल्वे स्थानकांवर केवळ १ रुपयात हे क्लिनिक … Read more

खबरदारी! पुण्यातील सर्व रेस्तराँ, परमीट रूम, बार, क्लब ३१ मार्चपर्यंत बंदचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरवात केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हद्दीतील सर्व परमीट रूम, बार आणि रेस्टॉरंट, क्लब ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 तसेच … Read more

करोनामुळं गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपये स्वाहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा कहर शेअर बाजारावर सुरूच आहे. आज सलग तिसर्‍या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार बंद झाले. बाजारातील अष्टपैलू विक्रीमुळे सेन्सेक्स 1709.58 अंक म्हणजेच 5.59 टक्क्यांनी घसरून 28,869.51 वर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 425.55 अंक म्हणजेच 75.7575 टक्क्यांनी घसरून 8,541.50 वर बंद झाला. आजच्या व्यवसायात सेक्टोरल इंडेक्समधील निफ्टी माध्यम वगळता बाकीचे … Read more

करोनामुळं सोने बाजारावर संक्रांत; ७५ टक्के मागणी घटली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनो विषाणूचा परिणाम आता भारतीय उद्योगांवर दिसू लागला आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, या प्राणघातक कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायाला फटका बसला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ज्वेलरी उद्योगाच्या मागणीत ७५ टक्क्यांनी घट झाली आहे. आता देशभरात फक्त २० ते २५ टक्के व्यवसाय होत आहे. ऑल इंडिया जेम्स अँड … Read more

राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका असं आवाहनही … Read more

Video: करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सचिन करतोय जनजागृती, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. देशात करोनाबाधितांची संख्या १४८ वर पोहोचली आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात राज्य सरकारतर्फे शाळा-कॉलेजं, मॉल, थिएटर, नाट्यगृह ३१ मार्चपर्यंत … Read more