पुण्याहून गावाकडे जाणार्‍यांची राष्ट्रीय महामार्गावर रिघ; गर्दी टाळण्यासाठी टोलमाफ होणार का?

सातारा प्रतिनिधि | आज संध्याकाळपासून पुण्याहून गावाकडे जाणार्‍यांची राष्ट्रीय महामार्गावर अक्षरशः रिघ लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी सर्व खाजगी कार्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने सर्वजणांनी गावाकडचा रस्ता धरला आहे. यामुळे आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून शासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोलनाक्यांना बंद ठेवण्याचे … Read more

चोरट्यांकडून मेडिकल दुकान फोडून सॅनिटायझर व मास्कची चोरी

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्याचा अचलपूर येथे एकाच रात्री चोरट्याने तीन मेडिकलची दुकाने फोडून त्यातील मास्क व सॅनिटायझर चोरून नेले आहे. त्याचबरोबर दुकानातील काही पैसे सुद्धा चोरून नेल्याचे उघड झाले आहे. अचलपुरातील प्रवीण एजन्सी, गौरव मेडिकल व कृष्णा मेडिकल येथे काल एका पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय चोरट्याने रेनकोट, रॉड व चाकूच्या सहाय्याने मेडिकल … Read more

सांगलीतल्या मार्केट यार्डात २० कोटींची उलाढाल ठप्प

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे करोना प्रसार वाढू नये, याची खबरदारी म्हणून प्रशासनाने मार्केट यार्डातील सौदेही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा परिणाम उलाढालीवर झाला असून सुमारे २० कोटीची व्यवहार ठप्प झाले. हळदीचे सौदे पूर्णपणे बंद राहीले. गुळाचे सौदे मात्र काही प्रमाणात खाजगी पातळीवर झाल्याची चर्चा असून गुळाचे सुमारे पन्नास टक्के सौदे झाल्याचे सांगण्यात येत … Read more

कोरोनोच्या दक्षतेसाठी सांगलीत आजपासून मद्यविक्री बंद

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकानं आणि परमीट रुम बार तसेच ताडी विक्रीची शुक्रवारपासून ते ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने गुरुवारी घेतला. जिल्ह्यातील बाजारपेठामध्ये गर्दी होवू नये, यासाठी दररोज ५० टक्के व्यापारपेठा बंद करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत करोनाचा एकही … Read more

कोरोना क्‍वारंटाईन पेशंट बाहेर फिरताना दिसला तर उचलून नेणार- गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख चेक पोस्ट नाक्यांवर वाहनातील प्रवाशांची तपासणी करण्यासाठी तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच क्‍वारंटाईन नागरिकांनी दक्षता म्हणून किमान चौदा दिवस घरातून बाहेर पडू नये. असे आढळल्यास त्यांना सक्‍तीने आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ठेवले जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात … Read more

सर्व खाजगी कार्यालये ३१ मार्च पर्यंत बंद, मुख्यमंत्र्याचे आदेश

मुंबई । राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण ५२ रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खाजगी कार्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली केली आहे. तसेच कोरोनामुळे सुट्टीवर पाठवलेल्या कर्मचाऱ्यांचे … Read more

कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई | कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनासोबत आपण युद्ध लढत आहोत. या कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. माणुसकीच्या अाधारेच आपण हे युद्ध लढत आहोत. तेव्हा या संकटाच्या काळात तुम्ही माणुसकी सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी … Read more

करोना इफेक्ट: टोपचा आठवडी बाजार, बिरदेव यात्रा आणि इतर कार्यक्रमही रद्द

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार दर गुरुवारी होणारा आठवडी बाजार आणि खाटीक व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री बिरदेव यात्रा हि दरवर्षी गुढीपाडव्यापासुन पाच दिवस चालते हीदेखील शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आली आल्याची माहिती टोपच्या लोकनियुक्त सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच शिवाजीराव पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. आ र. देवकाते … Read more

कोल्हापूरात वैद्यकीय सेवेतील सर्वांना मिळणार ‘कॉटन मास्क’

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्हयातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स आदी सर्वांना मास्क देणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीपीआरमधील कोरोना स्वतंत्र कक्षाला खासदार माने यांनी भेट देऊन रुग्णांना पुरविण्यात येणाऱया वैद्यकीय सेवा व सुविधांचा आढावा घेतला याप्रसंगी ते बोलत होते. मास्कच्या उपलब्धतेसाठी इचलकरंजीतील गारमेंट … Read more

जिल्ह्यात परदेश दौऱ्यावरून येणाऱ्या व्यक्तींनी होम कोरोन्टाईन करून घ्यावे- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर परदेश तसेच जिल्ह्याबाहेरुन प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्या, आलेल्या नागरिकांनी स्वत: आरोग्य तपासणी करून 14 दिवस घरीच स्वत:ला होम कोरोन्टाईन करून घेवून घरामध्ये सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून आवश्यक उपाययोजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या … Read more