शिवसेनेने विचार करून राज्यसभेत मतदान करावं- कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेनं पाठिंबा दिल्यानंतर राज्यात सत्तेत सहभागी काँग्रेसने काहीसा नाराजीचा सूर लगावला आहे. यागोष्टीला नमूद करताना राज्याचे कॅबिनेट मंत्री काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला मोलाचा सल्ला देणारी प्रतिक्रिया माध्यमांत दिली आहे.

ठाण्यामध्ये १८ काँग्रेस नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे बाळासाहेब थोरातांचे आदेश

गुरुवारी झालेल्या भिवंडी महापौर निवडणुकीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी मतदान करून निवडून दिल्याने काँग्रेसचे बंडखोर इम्रानवली खान यांच्या गळ्यात उप महापौर पदाची माळ गळ्यात पडली. आता यानंतर काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी थेट ठाणे गाठत पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांच्याकडे काँग्रेस पक्षाचा बनावट व्हीप काढून तो वृत्तपत्रात जाहीर केल्याने याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट; सत्तास्थापनेच्या दृष्टीने खलबत सुरु

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचले आहेत. आगामी राजकीय समिकरणांच्या दृष्टीने थोरात पवार भेटीला अधिक महत्व प्राप्त झालंय.

बाळासाहेब थोरातां विरोधात नवलेंना उमेदवारी; विखेंनी केली मोर्चे बांधणी

अहमदनगर प्रतिनिधी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी युतीने श्रमिक उद्योग समुहाचे प्रमुख साहेबराव नवले यांना मैदानात उतरले आहे. नवलेंना सेनेकडून बुधवारी सायंकाळी संगमनेर विधानसभा जागेसाठी एबी फॉर्म दिला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून युतीकडून सक्षम उमेदवारासाठी चाचपणी सुरू होती. अनेक नावांवर चर्चा झाली … Read more

थोरातांनी आत्मपरीक्षण करावं; विखेंचा थोरातांना सल्ला

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात विखे आणि थोरात वाद सर्वानाच माहिती आहे. त्यात बुधवारी निळवंडे धरणाच्या भूमिपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार होते. त्यामुळे बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंच्या हस्ते भूमिपूजन ही बाब थोरात समर्थकांना खटकली. त्यामुळे त्यांनी विखे ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्याला आडवे होऊन थोरात यांच्या समर्थांनी घोषणा … Read more

मी आत्ताच मुख्यमंत्री आहे- इंदोरीकर महाराज

अहमदनगर प्रतिनिधी। भाजपची महाजनादेश यात्रा अहमदनगर जिल्ह्यात आली होती. या यात्रेच्या संगमनेर येथील सभेत किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी हजेरी लावली होती. त्यामुळ संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात इंदुरीकर महाराज यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र एका कीर्तनात संगमनेरमधून आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा इंदुरीकर … Read more