‘मी पण सावरकर’ म्हणत भाजपा आमदार विधीमंडळात आक्रमक

नागपूर प्रतिनिधी | नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपानं यावेळी केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपानं आक्रमक भूमिका घेतली आहे . राहुल गांधींनी हे सांगून … Read more

माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे त्यामुळं माफी मागणार नाही;राहुल गांधींनी केला भाजपवर पलटवार

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी देशात भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचे सांगत मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. हे करत असताना राहुल यांनी भाजपसाठी लोकप्रिय असलेल्या मेक इन इंडिया या घोषणेचा विपर्यास करत ‘रेप इन इंडिया’ असं म्हणत भाजपला डिवचण्याचा प्रयन्त केला होता. तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या वादग्रस्त विधानावर संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपने करत राजकारण तापवलं असताना. राहुल यांनी भाजपवर पलटवार केला आहे. “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान राहुल यांनी हे विधान केलं.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर नाराजी व्यक्त करत समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पी.चिदंबरम यांना केलेली अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती- राहुल गांधी

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं आणि देश सोडून जाऊ नये या दोन अटींवर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत नेहमी सत्याचाच विजय झाला असल्याचे सांगितले आहे.

चौकीदार चोर है ! या विधानावर राहुल गांधींचा माफीनामा

आज सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अवमान प्रकरणात कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है असे वक्तव्य केलं होत. या वक्तव्यावर कोर्टाने राहुल गांधी यांना माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच न्यायालयाने राफेल प्रकरणातील पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. यासह शबरीमाला मंदिराचा निकाल देणाऱ्या कोर्टाने तो एका मोठ्या खंडपीठाकडे सुपूर्द केला आहे.

राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्ल्या – स्मृती इराणी

”काँग्रेस चे राहुल गांधी म्हणतात त्यांना शेतकऱ्यांची चिंता आहे. मात्र अमेठी मध्ये जाऊन शेतकऱ्यांना विचारा.राहुल गांधींनी तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्या” अशी घणाघाती टीका केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आणि ‘भाजपा’च्या स्टार प्रचारक स्मृती इराणी यांनी केली आहे. श्रीगोंदा येथे बबनराव पाचपुते यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुजय विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राहुल गांधी घेणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचारात उडी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. ते महाराष्ट्रात दोन दिवस प्रचार करणार आहेत. राहुल गांधी नुकतेच कंबोडिया दौरयावरून मायदेशी परतले आहेत. राहुल गांधी हे प्रचारासाठी मैदानात उतरणार असून आम्ही ही निवडणूक संपूर्ण ताकदीनीशी लढवू असं मत काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी व्यक्त केलं.

गांधी जयंतीला राहुल यांची वर्ध्यात पदयात्रा

वर्धा प्रतिनिधी। महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या समारोपाचे; तसेच महाराष्ट्र-हरियाणातील विधानसभा निवडणुकांचे औचित्य साधून येत्या २ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामपासून पदयात्रा काढणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा हरियाणामध्ये, तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी दिल्लीत पदयात्रा काढणार असून काँग्रेस पक्षाने गांधी जयंती समारोप देशव्यापी कार्यक्रमांनी साजरा करण्याचे ठरविले … Read more

कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने ठोकला अध्यक्ष पदावर दावा

नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभूत झाल्या नंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांच्या जागी कोणत्या नेत्याची वर्णी लावायची यावर पक्ष खलबते कुटत असतानाच मध्य प्रदेशातील कॉंग्रेस नेते अस्लम शेरखान यांनी आपल्याला कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी बसवावे अशी मागणी राहुल गांधी यांना केली आहे. आपण राष्ट्रीय अध्यक्ष पद सांभाळायला असमर्थ असाल … Read more

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ ; उमेदवारी अर्ज रद्द करण्याची ‘या’ उमेदवाराने केली मागणी

Untitled design

नवी दिल्ली |काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघातील दाखल केलेला उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी अपक्ष उमेदवार ध्रुवलाल आणि बहुजन मुक्ती पक्षाचे उमेदवार अफजाल वारिस यांनी केली आहे. अमेठी येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कडे या दोन उमेदवारांनी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.  Ravi Prakash, lawyer … Read more