भिवंडीमध्ये सडलेल्या फळांचा ज्युस विकत होता फळ विक्रेता, किळसवाणा व्हिडिओ आला समोर

Fruit Juice

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – फळांचा ज्यूस (fruit juice) आपल्या आरोग्यासाठी चांगलाच लाभदायक असतो. त्यामुळे डॉक्टर नेहमी फळांचा ज्यूस घ्यायचा सल्ला देत असतात. मात्र भिवंडीमध्ये एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एक फळविक्रेता चक्क सडलेल्या फळांचा ज्यूस (fruit juice) विकत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिवंडीमध्ये सडलेल्या फळांचा ज्युस … Read more

समुद्रकिनाऱ्यावरुन कार पळवताना ओली वाळू सरकली आणि कार समुद्रात अडकली

arnala sea

पालघर : हॅलो महाराष्ट्र – समुद्रकिनाऱ्यावर कार चालवण्यास लोकांना सक्त मनाई आहे. पण काही पर्यटकांना काहीतरी वेगळे करण्याची हौस असते. मात्र कधी कधी हीच हौस त्यांच्या अंगलट येते. अशीच एक घटना अर्नाळा समुद्र (arnala sea) किनाऱ्यावर घडली आहे. यामध्ये अर्नाळा समुद्र (arnala sea) किनाऱ्यावर भरतीच्या पाण्यात मारुती सुझुकीची अर्टिगा ही गाडी वाळूत रुतली. या घटनेचा … Read more

धक्कादायक ! जमिनीच्या तुकड्यासाठी बापानेच मोठ्या मुलाची केली हत्या

bhiwandi crime

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये बाप आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका जमिनीच्या तुकड्यासाठी जन्मदात्या बापानेच आपल्या मुलाची हत्या केली आहे. भिवंडी तालुक्यातील कशिवली या गावामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी सख्या बापाने मुलाच्या मदतीने आपल्या मोठ्या मुलाची हत्या केली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

भिवंडीत सशस्त्र दरोडा; कुटुंबावर हल्ला करून लाखोंचे दागिने पळवले

bhivandi crime

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भिवंडी शहराला लागून असलेल्या खोणी या गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर सशस्त्र 5 दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. या दरोडेखोरांनी घरातील एका खोलीत झोपलेल्या वयस्क महिलेच्या गळ्यावर सूरा ठेवून तिच्या अंगावरील दागिने घेऊन पलायन केले आहे. भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी गावात … Read more

भिवंडीमध्ये महागड्या बाईकची चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भिवंडीमध्ये अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे. यामध्ये घराबाहेर पार्क करण्यात आलेली महागडी बाईकच चोरटयांनी पळवून नेली आहे. भिवंडी तालुक्यातील वडपे गावात ही घटना घडली आहे. चोरीची संपूर्ण घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. https://twitter.com/RajaramUbhe/status/1497586191046418434 काय आहे … Read more

भिवंडीत चोरटयांनी हॉटेलचे शटर उचकटून गल्ल्यावर मारला डल्ला

bhiwandi crime

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – मागील काही काळापासून भिवंडी शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे आरोपी चोर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दुकानांवर व घरांवर दरोडा टाकत असत. अशीच एक घटना भिवंडी शहरातील कणेरी परिसरामध्ये घडली आहे. या ठिकाणी चोरटयांनी मुक्कदर हॉटेलचं शटर उचकटून हॉटेलमधील गल्लाच लंपास केला आहे. हि संपूर्ण घटना त्या … Read more

विरारमध्ये इमारतीच्या गॅलरीत खेळत होती चिमुरडी, अचानक तोल गेला अन्…

rijal keswani

विरार : हॅलो महाराष्ट्र – विरारमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एका 6 वर्षांच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. रिजल केसवाणी असे या चिमुकलीचे नाव आहे. रिजलच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून … Read more

4 लेकरांच्या आईचे 6 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाबरोबर झेंगाट, मात्र एका शर्टामुळे…

bhiwandi crime

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – आपण अनेकदा ऐकतो प्रेम आंधळे असते अन् प्रेमाला वय नसतं पण ठाण्यातील भिवंडीमध्ये या गोष्टीचा प्रत्यय आला आहे. 4 लेकरांची आई असेलेली महिला आपल्यापेक्षा सहा वर्षाने लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली. या प्रेम संबंधामध्ये आपल्या पतीचा अडथळा येत होता म्हणून तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने जंगलात नेऊन पतीची हत्या केली. इतकेच … Read more

पाण्यानी भरलेल्या बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू; घरातले काहीजण TV पाहत होते अन्…

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. हि घटना भिवंडीमध्ये घडली आहे. यानंतर भिवंडीतल्या भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दिलकैश अन्सारी असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. भिवंडी शहरातील देव नगर भागामध्ये हि … Read more

इमारतीवरुन सेल्फी काढताना तोल जाऊन 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – आतापर्यंत सेल्फी काढण्याच्या नादात बाळगलेल्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच निष्काळजीपणामुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात राहण्याऱ्या एका 13 वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला आहे. सेल्फी काढत असताना इमारतीवरून तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा येथील हीना मार्केट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या … Read more