पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले? अमित शहांच्या सवालाला रोहित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

पुणे प्रतिनिधी | महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी शरद पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले हे सांगा असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोलापूरच्या सभेत केला होता. त्याच सवालाचे उत्तर देण्यासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार पुढे सरसावले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अमित शहा यांना उत्तर दिले … Read more

काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात माझे एकही काम झाले नाही : उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस वर टीका केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना माझे एकही काम झाले नाही असे म्हणत उदयनराजे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारवर टीका केली आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजपच्या महाप्रवेशातच उदयनराजेंच्या … Read more

उदयनराजे , अमोल कोल्हे भेट ; शिष्टाई निष्फळ ; कोल्हेंनीच दिले उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचे संकेत

सातारा प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना साताऱ्यास पाठवले. अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट देखील घेतली मात्र उदयनराजे राष्ट्रवादीत राहण्यास तयार नसल्याचेच कोल्हे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून दिसून येते. अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्यात बंद खोलीत बराचवेळ चर्चा झाली. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद … Read more

काँग्रेसच्या मुस्लिम महाराष्ट्र कार्यध्यक्षाच्या भावाने केला भाजपमध्ये प्रवेश

मीरा भाईंदर प्रतिनिधी | काँग्रेसचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा भाऊ समाजसेवक सय्यद मूनव्वर हुसेन यांनी व त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मिरा भाईंदर मधील मुझफ्फर हुसेन हे काँग्रेसचे जुने जाणते नेते असून ते काँग्रेसचे माजी आमदार आहेत. तसेच आता एक महिन्यापूर्वीच काँगेस पक्ष … Read more

राष्ट्रवादीचा उपप्रदेशाध्यक्ष करणार शिवसेनेत प्रवेश

शिरूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र सध्या बघायला मिळत आहे. कारण राष्ट्रवादीचे बडे नेते तर पक्ष सोडतच आहेत. त्याच प्रमाणे छोटे कार्यकर्ते देखील या पक्षांना सोडून चालले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते आहे. मंगलदास बांदल यांनी … Read more

काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांचा हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळतीचे ग्रहण लागलेले असतानाच आता अब्दुल सत्तार यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मागील काही दिवसापासून अब्दुल सत्ता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या येत असतानाच सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला नक्कीच धक्का बसला असणार हे मात्र निश्चित. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या अब्दुल सत्तार … Read more

युतीची घोषणा होण्याआधीच चंद्रकांत पाटलांनी केली चार उमेदवारांच्या नावाची घोषणा

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना भाजपने चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करून टाकली आहे. युती होवो अथवा न होवो वाईतून मदन भोसले, कोरेगावातून महेश शिंदे, दक्षिण कराड मतदार संघातून अतुल भोसले आणि कराड उत्तरमधून मनोज घोरपडे हे भाजपचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. … Read more

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हे दोन बडे नेते विधानसभा निवडणूक लढवण्यास झाले अपात्र

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन या दोघांना घरकुल घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्यावर शनिवारी धुळे सत्र न्यायालयात शिक्षा सुनावण्यात आली. देवकरांना ५ वर्षांची तर सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच प्रमाणे त्यांना १०० कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. दोघांनी केलेला … Read more

हर्षवर्धन पाटील ही भाजपमध्ये जाणार ; बुधवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठरवणार पुढील दिशा

इंदापूर प्रतिनिधी | काँग्रेस नेते तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आगामी विधानसभा भाजपमधून लढवावी असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करून पुढील राजकीय दिशा ठरवण्याचा निर्धार केला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी इंदापूरची जागा सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाही. त्यामुळे पाटील यांचे मन भाजपकडे वळले आहे अशी चर्चा सध्या … Read more