किराणा दुकानदारांसाठी नवा नियम ; फक्त ‘या’ वेळेतच सुरू राहणार दुकाने ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यातच आता काही वेळापूर्वी राज्यात किराणा दूकान सकाळी 7 ते 11 या दरम्यान सुरु … Read more

सिटीस्कॅनसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

औरंगाबाद : जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत असून त्याव्दारा अचूक निदान होत आहे. तरी कोरोनाचे निदान करण्यासाठी सिटीस्कॅन (एचआरसीटी ) करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी येथे दिले. सिटीस्कॅन करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल रुग्णांकडे असणे बंधनकारक असल्याचेही ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या निदानासाठी करण्यात येत असलेल्या सिटीस्कॅनच्या … Read more

कोविड रुग्णांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन द्या : जिल्हाधिकारी

औरंगाबाद | कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय उपचाराच्या सुविधांची पाहणी घाटी रुग्णालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केली. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या कोरोना वार्ड क्रमांक-4 या ऑक्सिजन व्हेंटिलेटरसह बेडची अतिरिक्त सुविधा उपलब्धेसाठी तयार करण्यात येत असलेल्या वार्डाची पाहणी करतेवेळी जिल्हाधिका-यांनी घाटी रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणांना सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. वर्षा रोठे यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित … Read more

जिल्ह्यात २५ व्हेंटिलेटर आणि ४५ ऑक्सिजन सिस्टीमची भर पडणार

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे आणि मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टीट्यूट औरंगाबाद यांच्या सामांज्यस करार झाला असून, त्यानुसार जिल्ह्यात २५ व्हेंटिलेटर आणि ४५ ऑक्सिजन सिस्टीमची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे आणि मराठवाडा मेडिकल अँड … Read more

दुकाने उघडण्याची परवानगी द्या : व्यापा-यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी

औरंगाबाद | जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’च्या शासन आदेशानंतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहेत. यामुळे लाखो दुकानदार व कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने कोरोनाचे नियम पाळत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, दुकानदारांना आर्थिक पॅकेज द्यावे, दुकाने उघडण्याची परवानगी दिली नाही तर सामूहिक आत्मदहन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापा-यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदन … Read more

सातारा : जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत सुधारित निर्बंध लागू; धार्मिक स्थळे, सलूनसह ‘या’ गोष्टी राहणार बंद

सातारा : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने निर्बंध वाढवणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार, प्राप्त असलेल्या अधिकारान्वये, सातारा जिल्हयात दि. 05/04/2021 रोजीचे 20.00 वाजले पासून ते दिनांक 30/04/2021 रोजीचे 23.59 वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. सातारा जिल्हयामध्ये दि. 05 एप्रिल 2021 … Read more

कोरोना रोखण्यासाठी बाजाराच्या ठिकाणी पथके नेमणार ः जिल्हाधिकारी 

Aaurngabad Jilhadhikari

औरंगाबाद | सध्याची कोवीडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगेन अगेनमधील तरतुदी ३० एप्रिलपर्यंत लागू केलेल्या आहेत. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना आटोक्यात आणावा, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस … Read more

कोरोना विषाणू प्रसारावर नियंत्रण आणा : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद | कोरोना विषाणू प्रसारावर नियंत्रण, लसीकरणावर अधिक भर देण्याबाबत खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, लसीकरणावर अधिक भर द्यावा, अशा सूचना देखील प्रशासकीय, वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. फुलंब्री तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी जास्तीत जास्त व्यापाऱ्यांच्या … Read more

हॉटेल्स, बारमध्ये गर्दी पाहून जिल्हाधिकारी शेखरसिंह प्रशासनावर संतापले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हॉटेल्स, बारमध्ये गर्दी दिसत आहे. तालुक्यात कोणतीही कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. नियम मोडणारे हॉटेल्स, बार, मॉल्स, मंगल कार्यालये यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ती सात दिवसासाठी सील करण्याच्या सूचना त्यांनी तालुका प्रशासनाला दिल्या. तालुक्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर … Read more

‘मिशन बिगेन अगेन’चे काटेकोरपणे पालन करा- जिल्हाधिकारी

औरंगाबाद | सध्याची कोवीडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगेनमधील तरतुदी 15 एप्रिलपर्यंत लागू केलेल्या आहेत. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना आटोक्यात आणावा असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. महाराष्‍ट्र शासनाच्‍या मिशन बिगेन अगेनच्‍या गाईडलाईन्‍सची जिल्‍हयामध्‍ये अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिका-यांच्‍या अध्‍यक्षतेखाली 1 एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. निखील … Read more