घोणशीच्या ऐश्वर्याचा राज्यात झेंडा : गावात वाजत- गाजत मिरवणूक

Aishwarya Gurav Ghonshi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या आनंदराव गुरव हिने मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदी मजल मारली आहे. राज्यात मुलींमध्ये तिसरा क्रमांक तीने पटकावला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरातील मुलीने मिळवलेले हे यश  तालुक्यासह सातारा जिल्ह्याची मान उंचावणारे आहे. घोणशीची कन्या ऐश्वर्याची गावातून वाजत- … Read more

कोंढव्यात नोकरी महोत्सव संपन्न; परवीन हाजी फिरोज यांच्या पुढाकाराने 300 तरुण-तरुणींना रोजगाराची संधी

Pune News

पुणे प्रतिनिधी | कोंढव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांच्या वतीने मंगळवारी रोजगार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. (GOYN) Global opportunity Youth Network, लाईटहाऊस या रोजगार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला पुणे शहरातील जवळपास 300 तरुण-तरुणींचा प्रतिसाद मिळाला. ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम पावसामुळे पुढे ढकलण्यात … Read more

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे शेवटची तारीख

HSC studant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. बोर्डाने फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. यानुसार आता दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर तर बारावी बोर्डासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेसाठी फॉर्म … Read more

शिक्षण क्षेत्राला भांडवलदारी हा रोग लागला : डाॅ. इंद्रजीत मोहिते

Dr. Shalaka Patil

कराड | शिक्षण क्षेत्रात भांडलवदारी, व्यावसायिकता आलेली आहे. स्वतंत्र भारतात पैशाचे वर्चस्व संपवून ज्ञानाचे वर्चस्व आणल्या शिवाय पर्याय नाही. शैक्षणिक क्रांती ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, ती न होता ती व्यावसायिक स्वरूपाची झाली आहे. शिक्षण क्षेत्राला भांडवलदारी सारखा रोग लागलेला आहे. मुलीच्या प्रगतीचे काैतुक तेव्हाच होईल, जेव्हा प्रत्येक घरातील मुलींच्या शिक्षणावर भर दिला जाईल, असे … Read more

राज्यातील पंधरा हजार शाळा बंदला विरोध : अशोकराव थोरात

Ashokrao Thorat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आधी गृहपाठ बंद, आता शाळा बंद, काही दिवसांनी गरिबांचे शिक्षण बंदचा निर्णय होईल हे सर्व अजब आहे. राज्यातील वीसच्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यास राज्यातील 20 पेक्षा कमी पट असलेल्या 15 हजार शाळा बंदला विरोध असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ … Read more

कराडला युवा महोत्सावात नाना पाटेकर साधणार युवकांशी संवाद

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने 42 व्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 14 रोजी सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात संपन्न होत आहे. यावेळी जेष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर हे युवकांशी संवाद साधणार आहेत. … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या १५ शाळा आदर्श बनविणार : आ. शंभूराज देसाई

सातारा | आदर्श शिक्षण देणे आणि आदर्श नागरिक घडविणे हे शासनाचे तसेच प्रशासनाचे उत्तरदायित्व असून त्या अनुषंगाने पाऊल टाकण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या 15 प्राथमिक शाळा आदर्श म्हणून विकसित करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीदरम्यान श्री. देसाई बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

छ. शिवाजी महाराजांच्या गुणांची जपणूक करणे हाच यशाचा शिवमंत्र : प्रा. डॉ. विनोद‌ बाबर

कराड | मोबाईल सारख्या अभासी दुनियेतून बाहेर येऊन लोकांच्या बरोबर संवाद साधला पाहिजे. छ. शिवाजी महाराजांचे आचार, विचार, कर्तृत्व, नेतृत्व ही जीवनमुल्ये घरघरातील युवकांनी जतन करणे हाच यशाचा होण्याचा शिवमंत्र असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी केले. यशवंत शिक्षण संस्थेचे गोटे- मुंढे (ता. कराड) येथील प्रितीसंगम विद्यालयात स्व. ए. व्ही. पाटील सर (आण्णा) … Read more

Fresher ला ऑफर लेटर देवूनही नियुक्ती रद्द; Wipro, Infosys अशा IT कंपन्यांनी असं का केलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राने शेकडो फ्रेशर्सना दिलेले जॉब ऑफर लेटर रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पात्रता आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कारण देत या फ्रेशर्स उमेदवारांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे फ्रेशर्स उमेदवारांचे स्वप्न भंगले आहे. अहवालानुसार, शेकडो फ्रेशर उमेदवारांना या कंपन्यांकडून ऑफर लेटर … Read more

MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र हे वेळापत्रक अंदाजित असून परीक्षेच्या प्रस्तावित तारखेमध्ये बदलही होऊ शकतो असं आयोगाने म्हंटल आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ … Read more