अण्णा प्लिज! शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करू नका!; गिरीष महाजनांची राळेगणसिद्धीत जाऊन विनंती

अहमदनगर । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन त्यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीत पोहोचले. आंदोलन करू नये, अशी विनंती महाजन यांनी अण्णांना केली आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचदरम्यान शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज भाजप … Read more

‘शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव, न्याय मिळावा हीच सदिच्छा’- शरद पवार

मुंबई । देशभरात आज राष्ट्रीय किसान दिवस साजरा होत आहे, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस. मात्र, दुर्दैवाने राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 26 दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत उभं राहून सरकारला घाम फोडत आहेत. या आंदोलनाचा धागा पकडतच … Read more

फट..फजिती! भाजपच्या कृषी कायद्याच्या जाहिरातीचा ‘पोस्टर बॉय’ शेतकरी आंदोलनात सहभागी

नवी दिल्ली । दिल्लीच्या सीमेवर अनेक दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजपच्या जाहिरातीतील शेतकरीही आहे. यामुळे भाजपवर नामुष्कीची वेळ ओढवली आहे. मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws ) दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन ( farmers protest ) सुरू आहे. या आंदोलनात पंजाबमधील शेतकरी हरप्रीतसिंग हेही सहभागी झाले आहेत. … Read more

‘माझ्या मृत्युस मोदी आणि शहांना जबाबदार धरावं’, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया

नवी दिल्ली । दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे गेल्या काही दिवासांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील एका शेतकऱ्याने आज आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याचे लक्ष येताच त्या शेतकऱ्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यामुळे त्याचे प्राण वाचले. पण आपल्या आत्महत्येच्या प्रयत्नाला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा कारणीभूत असल्याचा आरोप त्याने केला. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील ६५ … Read more

भाजपने घेतला अण्णांचा धसका? दिल्लीत आंदोलन करण्याचं जाहीर करताचं हरिभाऊ बागडे राळेगणसिद्धीत

राळेगणसिद्धी । केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजपमध्ये एकचं खळबळ उडाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राळेगणसिद्धीत जाऊन आण्णांशी चर्चा केली. अण्णांच्या आंदोलनाची धास्ती घेतल्यानेच या गाठीभेटी सुरू केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. (bjp leader haribhau bagade … Read more

भाजपचं खरी ‘तुकडे तुकडे गँग’; हिंदुंना शिखांविरुद्ध भडकावण्यापासूनं बंद करा!

नवी दिल्ली । कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी भाजपला ‘तुकडे तुकडे गँग’ म्हणून संबोधलंय. आपल्या माजी सहकारी असलेल्या भाजपला त्यांनी ‘खरीखुरी तुकडे तुकडे गँग’ म्हटलंय. पंजाबमध्ये हिंदुंना शिखांविरुद्ध करण्याचा आरोप सुखबीर सिंह बादल यांनी केलाय. ‘देशात भाजप खरीखुरी तुकडे तुकडे गँग आहे. त्यांनी देशाच्या एकतेला तुकड्यांत … Read more

“जर ते शेतकरी नसून खलिस्तानी, पाकिस्तान-चीनचे एजंट, आहेत तर सरकार त्यांच्याशी चर्चा का करतंय?”; चिदंबरम यांचा सवाल

नवी दिल्ली । मोदी सरकारने आणलेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम असून 14 डिसेंबरपासून आंदोलन आणखी तीव्र केलं जात आहे. शेतकरी संघटनांचे नेते सामूहिक उपोषण करणार असून, देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmer Protest) काही नेत्यांनी शेतकऱ्यांमध्ये काही नक्षलवादी असल्याचाआरोप केला तर काहींनी आंदोलनामागे चीन … Read more

शेतकरी आंदोलनाने मोंदीचे मंत्री बिथरले; खलिस्तान, पाकिस्ताननंतर आता केला ‘हा’ आरोप

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या १६ दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. आधी पंजाब, हरियाणानंतर शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. यादरम्यान, मोदी सरकारवर दबाव वाढत असून मोदी सरकारचे मंत्रीगण या आंदोलनावर विविध गंभीर आरोप करताना दिसत आहेत. कधी शेतकऱ्यांना खलिस्तान समर्थक, तर कधी याआंदोलनामागे थेट चीन-पाकिस्तानचा हात असल्याचा निराधार आरोप … Read more

देशात शेतकरी आंदोलन सुरुये अन लोक माझ्या बिकनीवर बोलतायत व्वा! भिडे गुरुजींची सोनू संतापली

मुंबई । ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील जुनी सोनू अर्थात निधी भानुशाली सध्या चर्चेत आहे. कारण आहे नेटकऱ्यांना डोळ्यात खुपलेले तिचे बोल्ड फोटो. निधीने तिचे बिकनीतील बोल्ड फोटो शेअर केलेत. गोव्यात सुट्टीचा आनंद घेत असलेल्या निधीने स्विमसूटमधील हे फोटो शेअर केलेत आणि ते लगेच व्हायरल झालेत. इतकेच नाही तर या फोटोवर कमेंट्सचा पाऊस … Read more

मोदी सरकारचा ‘हा’ प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला! १४ तारखेला पुकारले देशव्यापी धरणे आंदोलन

नवी दिल्ली । दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या 14 व्या दिवशी मोठ्या घडामोडी घडत आहेत. मंगळवारी झालेल्या भारत बंदनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आज केंद्रातील मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना नवा प्रस्ताव देण्यात आला. पण शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा हा कायदा दुरुस्ती प्रस्ताव एकमताने फेटाळला आहे. नव्या कायद्यात किमान आधारभूत … Read more