शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य आहे; राष्ट्रपतींच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली । ‘कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर असूनही शांततामय मार्गानं आपल्या मागण्या सरकारपुढे आपलं म्हणणं मांडणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. आज विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या एका प्रतिनिधीमंडळानं पुढाकार घेऊन राष्ट्रपती कोविंद यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी विरोधी नेत्यांच्या गटात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) … Read more

दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचे तर्कट

जालना । केंद्रातील मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरुद्ध राजधानी दिल्लीत गेल्या १३ दिवसांपासून पंजाब, हरयाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे भाजपचेच नेते या आंदोलनावर टीका- टिप्पणी करताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब … Read more

‘जो बोले सो निहाल’ म्हणत शेतकरी आंदोलनात इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूनेही घेतली उडी; लंडनमधील मोर्चात झाला सामील

लंडन । भारतातील शेतकऱ्यांना आता देशाबाहेरुनही चांगला पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘जो बोले सो निहाल’ म्हणत आता शेतकरी आंदोलनात इंग्लंडच्या एका माजी क्रिकेटपटूनेही आता उडी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. या क्रिकेटपटूने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी कायदा बदलण्याची मागणी केली आहे. या क्रिकेटपटूचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. हा इंग्लंडचा माजी … Read more

शेतकरी आंदोलन: …तर पंतप्रधान आणि गृहमंत्री स्वत: जाऊन शेतकऱ्यांशी बोलतील!

मुंबई । केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ सुरू असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सरकारनं दबावाखाली येण्याची गरज नाही. केवळ मनानं विचार करणं गरजेचं आहे. डोक्यानं नव्हे. आपला देश कृषिप्रधान देश आहे. तसं आपण मानत असू तर शेतकऱ्यांचं ऐकायलाच हवं. आपण शेतकऱ्यांचं … Read more

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच नजरकैदेत! दिल्ली पोलिसांवर ‘आप’चा गंभीर आरोप

नवी दिल्ली । दिल्लीच्या सीमेवर गेल्या 12 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्यांच्या या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेससह आम आदमी पक्षानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Delhi … Read more

बस झाली चर्चा! लेखी स्वरुपात उत्तर द्या; शेतकरी संघटनांची रोखठोक भूमिका

नवी दिल्ली । कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता आणखी शिगेला पोहोचला आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात पाचवी बैठक सुरू आहे. या बैठकीतही सरकार आणि शेतकरी आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशात शेतकऱ्यांनी “आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात काय ते उत्तर द्या”, अशी भूमिका घेतली आहे. … Read more

मुंडा कमाल है! कंगनाला ट्विटरवॉरमध्ये धोबीपधाड दिल्यावर ‘दिलजीत दोसांज’चे वाढले तब्बल ‘इतके’ फॉलोअर्स

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यातील ट्विटर वॉरला दोन दिवस झाले. कंगनाने एका वयोवृद्ध शेतकरी महिलेबाबतची एक फेक न्यूज ट्विटरवर पोस्ट केली होती. शिवाय या ट्विटमध्ये कंगनाने सदर महिला ही १०० रूपयात प्रोटेस्टसाठी अव्हेलेबल होते, असा दावा केला होता. मात्र, तिच्या ट्विटमध्ये तिने केलेला दावा फोल ठरल्यावर तिने ते ट्विट डिलीट केले. … Read more

स्वाभिमान! मोदी सरकारच्या भोजनास ‘नम्र’ नकार देत शेतकऱ्यांनी सोबत आणणलेली ‘शिदोरी’ खाल्ली वाटून

नवी दिल्ली । कृषी कायद्याचा विरोधी आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. आज (गुरुवारी) सरकारकडून चौथ्यांदा शेतकऱ्यांशी संवाद साधला जातोय. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधिमंडळाला आज केंद्र सरकारनं चौथ्यांदा चर्चेसाठी पाचारण केलं. आजच्या चर्चेदरम्यान आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधिमंडळानं सरकारनं व्यवस्था केलेलं जेवणंही नाकारलं. आपल्या दुपारच्या भोजणाची व्यवस्था आम्ही केली असून जेवण सोबतच घेऊन आल्याचं या शेतकऱ्यांनी नम्रपणे सांगून बैठकीच्या ठिकाणीच सोबत … Read more

शेतकरी आंदोलनास्थळी पोहोचल्या ‘शाहीनबाग’मधील आजी; पोलिसांनी घेतलं ताब्यात

नवी दिल्ली । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीनबाग येथे झालेल्या आंदोलनाचा चेहरा बनलेल्या बिल्किस बानो यांनीसुद्धा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच दिल्लीच्या सीमेवर सुरू झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या सिंघू बॉर्डवर पोहोचल्या आहेत. शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीच्या सीमेवर सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी सीमेवर नाकेबंदी केली … Read more

शेतकऱ्यांवरील कारवाई पाहून ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मा संतापला; आंदोलनाला पाठिंबा देत म्हणाला…

मुंबई । मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Protest) पेटलं आहे. आता या लढ्याची धग दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून, जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा (29 नोव्हेंबरला) शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर अभिनेता, कॉमेडियन कपिल … Read more