अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना 555.39 कोटींची मिळणार मदत – जिल्हाधीकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषातील देय मदतीपेक्षाही अधिक म्हणजेच एकूण 555.39 कोटींची आर्थिक मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. अतिवृष्टी, पुराने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची जिल्ह्यात प्रत्यक्ष पाहणी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई … Read more

प्रा. शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Murder

औरंगाबाद – डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाचा तपास करीत असलेले विशेष चौकशी पथक (एसआयटी) बुधवारी (दि. १३) उस्मानाबादेत धडकले. या पथकाने डॉ. शिंदे यांच्या पत्नी डॉ. मनीषा यांनी ज्या सहकाऱ्यांशी खुनाच्या घटनेनंतर संपर्क साधला, त्यांची कसून चौकशी केली. त्याशिवाय इतरही सहकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासत जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, औरंगाबादेत पथकाने दिवसभर हत्यारांचा कसून … Read more

शहरातील तब्बल नऊ लाख लोक राहतात बेकायदा वस्तीत

aurangabad

औरंगाबाद – महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहर परिसरात गेल्या काही वर्षात बेकायदा वसाहतींची संख्या झपाट्याने वाढली आहे. या भागात शहराची निम्मी लोकसंख्या म्हणजेच सुमारे नऊ लाख नागरिक राहतात. बेकायदा घरांची संख्या (गुंठेवारी भाग) अडीच लाखांच्या घरात असल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात नुकतीच सुधारणा केली आहे. आता डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित केले जात … Read more

औरंगाबाद- सोलापूर महामार्गावर ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार !

Car Burn

औरंगाबाद – औरंगाबादहून भरधाव वेगात मुरमुरे घेऊन बीडकडे जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरसह मुरमुरे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे (ता.पैठण) जवळ घडली असुन सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक माहिती अशी, औरंगाबादहून मुरमुरे घेऊन कंटेनर भरधाव वेगात बीडकडे जात असताना बुधवारी पहाटे … Read more

…अन्यथा एक नोव्हेंबरपासून अनधिकृत घरांवर ‘बुलडोझर’

JCB

औरंगाबाद – राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करून डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी भागातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मालमत्ताधारकांना गुंठेवारीच्या फाइल दाखल करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीत गुंठेवारी फाइल दाखल केल्या नाहीत, तर एक नोव्हेंबरपासून बेकायदा मालमत्तांवर जेसीबी चालविला जाईल, असा इशारा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी … Read more

औरंगाबाद मनपाने एकाच दिवसात वसूल केले तब्बल पावणेदोन कोटी रुपये !

aurangabad mahanagar

औरंगाबाद – महापालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल करण्यावर विशेष भर दिला आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल पावणेदोन कोटी रुपये वसुली झाली, अशी माहिती मनपा उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक अधिकारी अपर्णा थेटे यांनी मंगळवारी दिली. कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने आता मालमत्ता कर वसुली मोहीमेवर जास्त भर दिला आहे. त्यामुळे दररोज विशिष्ट … Read more

तलावात कार बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Accideant

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या जडगाव येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने गावाशेजारील कोल्हापुरी बंधार्‍यात कार बुडुन एकाच कुटुंबातील चौघे बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जडगाव येथील कोल्हापुरी बंधार्‍यात घडली. दरम्यान, पाच वाजेपर्यंत ही कार पाण्याबाहेर काढण्यात यश आले नव्हते. मुळ सेलुद चारठा (ता.औरंगाबाद) … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी औरंगाबादेत मनसेचे धरणे आंदोलन; राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

mns

औरंगाबाद – सप्टेंबच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनसह अनेक पिकं वाहून गेली. तर काही भागात जमीनही खरडून गेली आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी आज औरंगाबादेत … Read more

औरंगाबादेत ड्रग्जच्या साठ्यावर छापा; हजारोंची औषधी जप्त

drugs

औरंगाबाद – मुंबईतील ड्रग्जचे प्रकरण राज्यभर गाजत असताना आता शहरातही अवैधरित्या गुंगीकारक औषधी आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आणणाऱ्या एकाला सिटी चौक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मानवी शरीरासाठी अपायकारक औषधी जप्त करण्यात आली आहेत. शहरातील लेबर कॉलनी परिसरातील विश्वास नगरात पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरु … Read more

‘जवाद’ चक्रीवादळाने बदलली दिशा, मराठवाड्याचा धोका टळला

औरंगाबाद – मागील आठवड्यातील भारतीय उपखंडात सुरु असलेल्या हवामानातील बदलांनुसार येत्या 16,17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘जवाद’ चक्री वादळाचा तडाखा बसणार असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. मात्र मागील चार दिवसात चक्रीवादळाची दिशा बदलली असल्याने या तडाख्यातून महाराष्ट्राची सुटका झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही राज्यातील काही … Read more