शिंदे सरकारच्या पहिल्याच निर्णयाला विरोध : भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना पाठिंबा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिंदे- फडणवीस सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिलाच घेतलेला निर्णय आणि आ. महेश शिंदेंचा ड्रिम प्रोजक्ट असलेल्या कोरेगाव एमआयडीसीला स्थानिकांनी विरोध केला आहे. बंगळूर- मुंबई औद्योगिक काॅरिडाॅरसाठी जमीन हस्तांतरणास सहा गावातील लोकांनी विरोध केला आहे. त्या संदर्भातील पत्र आज जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, भाजप आ. जयकुमार गोरे आणि आ. महेश शिंदे यांना … Read more

भाजपाची तिरंगा बाईक रॅली : कराडात आ. जयकुमार गोरे, अतुल भोसलेंची उपस्थिती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या अभियानाची जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कराड शहरात आज भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ हुतात्मा स्मारकात हुतात्मा स्तंभास अभिवादन करुन करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, डाॅ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत कराड शहरातील विविध भागातून … Read more

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत : आ. जयकुमार गोरेंचा आ. रामराजेंना टोला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसं काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असा खोचक टोला आ. जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला. विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात जोरदार रंगू लागली आहे. यावर बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष व … Read more

आ. जयकुमार गोरेंना दिलासा नाही, चुकीची माहिती पसरवत आहेत : महादेव भिसे

Jaykumar Gore

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मायणी येथील मृत व्यक्तीला जिवंत दाखवून त्याची जमीन बोगस कागदपत्रांच्या आधारे गोरेंनी घेण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात आ. गोरे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळालेला नाही. परंतु जनतेमध्ये सहानुभूती मिळवण्याकरिता साळसुदपणाचा आव आणून गोरे यांचे वकील अॅड. खोत हे चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप याप्रकरणातील तक्रारदार महादेव भिसे यांनी केला आहे. … Read more

आ. जयकुमार गोरेंचे भाकित : यंदाच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विठ्ठलाची पूजा करतील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आमदार गुजरात येथे असल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी यंदाच्या आषाढी वारीला देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करणार असल्याचे भाकीत केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ … Read more

अजित दादा खंडणी, काम अडविण्यात तुमचेच कार्यकर्ते : आ. जयकुमार गोरे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अजित दादांनी कोण खंडणी मागतय, कोण काम अडवतंय यांची माहिती घेतली तर एक बोट पुढे तर चार बोटे सरकारकडे जातील. तेव्हा दादांनी तसेच प्रशासनाने यांची तातडीने चाैकशी करावी. यामध्ये जे कोणी असतील त्याच्यावर कारवाई करण्यासाठी माझी काही हरकत नाही. अजित दादांनी कोणाचे नाव घेतले नव्हते, त्यामुळे आपण अंदाज बांधणे चुकीचे … Read more

आ. गोरेंचा काॅलेज हडपण्याचा डाव उधळल्याने राष्ट्रवादीवर आरोप : दीपक देशमुख

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मायणी येथील मेडिकल कॉलेज फुकटात हडपण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी डाव टाकला होता. मात्र सभासदांना वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांच्या कृत्याचा विरोध झाला. त्यामुळेच आमदार जयकुमार गोरे हे कॉलेजची बदनामी करण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत. कॉलेज हडप करण्याचा त्यांचा डाव देशमुख कुटुंबीय यशस्वी होऊ देणार नाही. पक्षीय झूल बाजूला … Read more

इंजबाव सोसायटीत राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुखांचा करिष्मा : विरोधकांचा धुव्वा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके इंजबाव (ता. माण) येथील विकास सेवा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांचा विजयी वारू रोखण्यासाठी एकत्र आलेल्या आ. जयकुमार गोरेंसह, जिल्हा बँकचे उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा बँकचे संचालक शेखर गोरे व डॉ. संदीप पोळ पुरस्कृत पॅनेलला धोबीपछाड दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ व जिल्हा परिषद सदस्या सौ. … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंना हायकोर्टाचा दिलासा, मात्र जामीन नाही

Jaykumar Gore

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण- खटाव मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयाने तात्पुरते अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे आ. जयकुमार गोरे यांना काहीसा दिलासा मिळाला असून 9 जून रोजी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आ. गोरेंना अटक करता येणार नसल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Jaykumar Gore

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासंदर्भात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आ. गोरेंना हा मोठा झटका न्यायालयाने दिल्याने आता अटक होणार का याकडे लक्ष लागून आहे. माण तालुक्यातील मायणी येथील मृत भिसे यांची … Read more