काॅलेज परिसरात अवैधरित्या पिस्टल बाळगणारास अटक

कराड | शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्या एकास अटक केली आहे. सैदापूर होली फॅमीली याठिकाणी पांढऱ्या रंगाची ॲक्टीवा मोटार सायकल (MH- 50- J- 6833) या गाडीवरून संशयित अखिलेश सुरज नलवडे हा पिस्टल घेवून फिरत होता. याबाबत गोपनीय बातमीदारांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली होती. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, वरिष्ठ पोलिस … Read more

चर्चा सुज्ञ नागरिकाची : कराड शहरात पाणी कपातीनंतर पुन्हा बॅनरबाजी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा- कोयना नदीकाठी असलेल्या कराड शहरावर पाणी कपातीची वेळ आलेली आहे. या पाणी कपातीमुळे नागरिकांच्यातून एक सुज्ञ नागरिक बॅनरबाजी करू लागला आहे. या सुज्ञ नागरिकाने बॅंनरबाजीतून आपला हक्क सांगितला आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवित जबाबदारीची जाणीव करून देताना आपण सेवक आहात… मालक नाही, आम्ही अन्याय सहन … Read more

टायर फुटल्याने ऊसाचा ट्रक पलटी : कराड शहरात विजय दिवस चाैकातील घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील मुख्य चाैक असलेल्या विजय दिवस चाैकात आज दि. 28 रोजी 2.15 वाजता ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. या चाैकात सर्वात जास्त वाहतूक असते तसेच लोकांची वर्दळ असते. त्यामुळे ट्रक पलटी होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मायणी येथून उसाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच – 04-बीजी- 3740) हा कराड … Read more

वाघ, बिबट्या नखे विकणार्‍यांना सापळा रचून अटक; 11 नखे जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील कृष्णा नाका परिसरात वाघ व बिबट्या नखे विकणार्‍या टोळीतील दोघांना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 11 वाघ व बिबट्याची नखे जप्त करण्यात आली आहेत. दिनेश बाबूलालजी रावल वय 38, रा. सोमवार पेठ, कराड, अनुप अरूण रेवणकर (वय 36, रा. रविवार पेठ, कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची … Read more

आटकेसह कराड शहरातील वाखाण परिसरात कृष्णा नदीकाठी 10 फूट लांब मगरीचे दर्शन

मगर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात वाखाण परिसरात कृष्णा नदीकाठावर मंगळवारी 10 रोजी दुपारी 8 ते 10 फूटाच्या मगरीचे दर्शन झाले. तर आटके परिसरातील पाचवड मळी नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी गावातील एका शेतकर्‍याला मगरीचे दर्शन झाले आहे. कराड शहरासह दोन ठिकाणी मगर पहावयास मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कराड शहरातील वाखाण परिसरातील सुहास … Read more

कराडला पुराचा फटका : पालिकेकडून 150 कुटूंबाचे स्थलांतर मात्र गळक्या खोलीत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संततधार पाऊस व कोयना धरणातुन सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या कराडच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदीचे पाणी हळूहळू कराड शहरात वाढू लागले आहे. परिणामी संभाव्य पुराचा धोका ओळखून कराड पालिकेच्यावतीने कराडमधील पाटण कॉलनी येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या 150 कुठुंबियांचे पालिकेच्या शाळेत सुरक्षित स्थलांतर करण्यात … Read more

कराड शहरात गुरूवारी 1 जुलै रोजी “हा” रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद : सरोजिनी पाटील

Karad Sarojini Patil Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने उद्या गुरुवारी दि.1 जुलै रोजी कराड शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. कार्वे नाका ते भेदा चौक या मार्गावर दुचाकी, चारचाकी, रिक्षा या लहान वाहन करता हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी पाटील … Read more

बंद घरात चोरट्यांकडून हातसफाई: ५० हजारासह तीन तोळे दागिने केले लंपास

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक शहरातील घरे बंद आहेत. कोरोनाच्या प्रसारामुळे शहरातील अनेक कुटुंबे आपल्या गावी गेली आहेत. याचा फायदा घेत बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांकडून चोरी केली जात असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशीच घटना सोमवारी कराड शहरातील समर्थनगर येथे उघडकीस आली. येथील कलबुर्गी फोटो स्टुडीओचे मालक अवधुत … Read more

कौतुकास्पद! स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका यंदाही देशात पहिली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड पालिकेने दुसऱ्यांदा बाजी मारत यंदाही देशात पहिला क्रमांक पटकावला. एक लाख लोकसंख्येच्या पालिका गटात कऱ्हाड शहर अव्वल ठरले. आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे त्याची अधिकृत घोषणा झाली. ही घाेषणा हाेताच कऱ्हाड पालिकेत उत्साहाचे वातावरण हाेते. गत वर्षी याच स्पर्धेत कऱ्हाड पालिकेने एक … Read more