कराड शहरात 15 ऑगस्टला तिरंगा पदयात्रेचे आयोजन : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कराड शहरात “तिरंगा पदयात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास चित्ररथांमधून मांडला जाणार आहे. हि पदयात्रा 15 ऑगस्ट 2022 रोजी तहसील कार्यालय येथून संध्याकाळी 4 वाजता निघणार असून या यात्रेचा समारोप कराड नगरपालिका येथील चौकात होणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी या तिरंगा यात्रेत सहभागी … Read more

अखेर कराडचा जुना पुल चारचाकी वाहनासांठी आजपासून सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात ये- जा केवळ दुचाकी वाहनांना सुरू असलेला ब्रिटीशकालीन जुन्या कोयना नदीवरील पूलावरून अखेर चारचाकी हलक्या वाहनांच्या वाहतुकीला आजपासून सुरुवात करण्यात आली. माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या वाहतुकीचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे आता चारचाकी व रिक्षा वाहतूक सुरू होणार असल्याने काही प्रमाणात कोल्हापूर … Read more

धक्कादायक : कराडला दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनीचा अचानक मृत्यू

कराड | शहरातील एसएमएस इंग्रजी स्कूलमधील दहावीतील स्नेहा डुबल हीचे अचानक निधन झाले. स्नेहाने दहावीचे दोन पेपरही दिले होते. त्यानंतर तीच्या पोटात दुखू लागल्याचे निमित्त झाले होते. तीच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना तीचा दुर्देवी मृत्यू झाला. एसएमएस इंग्रजी माध्यमाच्या शाळेत स्नेहा दहावीत होती. बोर्डाची परीक्षा देत असलेल्या स्नेहाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. स्नेहाने … Read more

छ. संभाजी महाराजांचे लोकसहभागातून साकारणार 55 फूटांचे भव्यदिव्य स्मारक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे येथील भेदा चौकात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकस्थळास शंभूतीर्थ असे संबोधण्यात येणार असून देशातील एक भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या स्मारकासाठी शासकीय परवानग्यांसाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसहभागातून या स्मारकाची उभारणी करण्यात येणार असल्याने कराड तालुक्याचा सहभाग या महत्वपूर्ण कार्यात घेण्याचा … Read more

कराड शहरासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 3 कोटींचा निधी

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहर व शहराच्या लगत वाढीव वस्तीतील रस्ते व इतर विकासकामांकरिता 3 कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे नगरपरिषदेच्या महसुलात घट झाल्याने विशेष बाब म्हणून आ. चव्हाण यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना वस्तुस्तिथी मांडली यामुळे … Read more

कराडला 23 एप्रिल ते 3 मे शिव महोत्सवाचे आयोजन : विनायक पावसकर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात हिंदू एकता समितीच्यावतीने 23 एप्रिल ते 3 मे या दरम्यान शिव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शिवजयंती साजरी करता आली नाही. मात्र, चालू वर्षी विविध कार्यक्रम, उपक्रम व स्पर्धा राबविण्यात येणार असून शिव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे जेष्ठ माजी नगरसेवक विनायक पावसकर … Read more

कराडला दोन दिवस भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन : सुभाषकाका पाटील

कराड | लिबर्टी मजदूर मंडळाने 70 किलो खालील भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सातारा जिल्हा कबड्डी असो. व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे मान्यतेने दि. 5 व 6 मार्च 2022 रोजी कराडमध्ये लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषकाका पाटील यांनी दिली. विजेत्या स्पर्धक संघांना अनुक्रमे बक्षीसे देण्यात … Read more

कराड शहरातील आग प्रकरणी प्रशासन योग्य ती कारवाई करेल : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरात आग लागली तेथे व्यवसाय सोडून काही अनावश्यक गोष्टी दिसत आहेत. लोकवस्ती दाट असल्यामुळे अगीने राैद्ररूप धारण केले. प्रशासन ही घटना घडल्यानंतर योग्य ती कारवाई करेल. शहरात अशाप्रकारे असणाऱ्या वस्ती, घरांवर प्रशासन निश्चितपणे कारवाई करेल, असा इशारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. कराड शहरातील वेशा वस्तीत मध्यरात्री आग लागून … Read more

कराडात मध्यरात्री सिलेंडरचा स्फोटात 25 घरे जळून खाक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरातील मुख्य भाग असलेल्या टाऊन हॉल, बापूजी सांळुखे पूतळा नजीक असणाऱ्या वेश्या वस्तीला मध्यरात्री दीड वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर आगीत सापडलेल्या चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याने सगळीकडे पळापळा सुरू झाली होती. या आगीत 20 ते 25 घरे पूर्णपणे जळून खाक झाली. तब्बल तीन तासानंतर … Read more

भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाच्या कराड शहराध्यक्षपदी प्रकाश जाधव

कराड | अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाच्या कराड शहराध्यक्षपदी प्रकाश जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्हाध्यक्ष संदिप जगताप यांनी या निवडीचे पत्र दिले. राळेगणसिध्दी येथे झालेल्या बैठकीत आण्णा हजारे यांनी संघटनेच्या पुनर्बाधणी करणेबाबत सर्व जिल्हाध्यक्षांना सुचना देण्यात आल्या होत्या. सातारा येथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत … Read more