उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली – पृथ्वीराज चव्हाण

कराड : डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे, अश्यावेळी प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. त्यांच्या प्रयत्नातून ६५ लाख रुपयांच्या निधीमधून वनवासमाची येथील जिल्हा परिषद शाळेचे रूपच पालटून नवीन शाळा बांधण्यात आली आहे या … Read more

10 वी च्या मुलीने जुन्या कोयना पुलावरून उडी घेतली; तरूणांनी धाडसाने ‘असे’ वाचविले प्राण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील एका 10 वी च्या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जुन्या कोयना पुलावरून उडी घेतल्याची घटना घडली. पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या मुलीला दोन मुलांनी धाडसाने वाचविले आहे. या मुलांच्या धाडसाचे कौतुक नागरिकांच्यातून केले जात आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज बुधवारी दि.16 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास … Read more

बायोमेडिकल संशोधनाला चालना : कृष्णा अभिमत विद्यापीठाचा ‘सी-मेट’शी सामंजस्य करार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) या स्वायत्त वैज्ञानिक संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे बायोमेडिकल संशोधनाला चालना मिळणार आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. … Read more

तोरणा किल्ल्यावर सैदापुरातील युवकाचा डोक्यावर दगड पडून मृत्यू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सैदापूर येथील एका युवकाचा तोरणा किल्ल्यावर डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओम महेशकुमार भरमगुंडे (वय 21, रा. सैदापूर, ता. कराड) असे युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील सैदापूर येथील ट्रेकर असणारा ओम भरमगुंडे हा पुणे येथे शिक्षणासाठी होता. दरम्यान रविवारी सुट्टी … Read more

कराडनजीक हॉटेलवर वन विभागाचा छापा; बंदिस्त ठेवलेल्या घारीची केली सुटका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील बेलवडे हवेली हद्दीत असलेल्या हॉटेल राऊमध्ये एक वन्य पक्षी घार ही पिंजऱ्यात बंदिस्त ठेवण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच कराड येथील वन अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तसेच एका पिंजऱ्यात बंदिस्त ठेवण्यात आलेल्या घारीला ताब्यात घेतले. याप्रकरणी हॉटेल मालक विवेक रामचंद्र देशमुख यांना वनविभागाने नोटीस बजावली आहे. याबाबात अधिक माहिती … Read more

संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियानात तासवडे गाव जिल्ह्यात द्वितीय; विभागीय समितीकडून पाहणी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान राबविण्यात आले. यामध्ये कराड तालुक्यातील तासवडे गावने सातारा जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या गावची नुकतीच विभागीय समितीकडून पाहणी करण्यात आली. राज्य शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान राबविण्यात … Read more

जातीयवादी पक्षांकडून देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेस पक्षाकडून देशभर सदस्य नोंदणी अभियान डिजिटल माध्यमातून राबविले जाणार आहे. कराड येथे या अभियानाचा प्रारंभ काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी चव्हाण यांनी केंद्र महत्वाचे विधान केले. “आता जातीयवादी पक्षांकडून देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा देशातील … Read more

पाच जणांकडून फसवणूक : कराडच्या युवकाचे मुलीशी लावले खोटे लग्न; पोलिसांकडून गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी लग्नावरून मुलगा अथवा मुलगीच्या कुटूंबियांची फसवणूक केल्याचे प्रकार घडतात. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. लग्न लावून देऊन युवकाची फसवणूक केल्याने पाच जणांवर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने विट्यासह खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. युवतीशी खोटे लग्न लावून चक्क युवकाची पाच जणांनी फसवणूक केली आहे. … Read more

कराड शहरातील रस्त्यांच्या कामाची गटनेते सौरभ पाटील यांच्याकडून पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंजूर केलेल्या निधीतून कराड शहरामध्ये विविध विकासकामे सध्या सुरू आहेत. याच निधीमधून प्रभाग क्रमांक 10 मध्ये खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या कामांची आज लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी पाहणी केली. तसेच कामासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. सध्या कराड शहरातील … Read more

ऊस तोडणी सुरु असताना सापडली बिबट्याची 3 पिल्लं; जवळपासच होती मादी बिबट्या

 कराड : तारुख येथिल पांढरीची वाडी येथील धरे शिवारात शेतकरी शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतात आज सोमवार दि. 31 जानेवारी रोजी दुपारी ऊस तोडणी सुरू असताना ऊस शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत. बिबट्याचा वावर, मानवी वस्तीत शिरकाव, प्राणी व माणसांवर होत असलेले हल्ले यामुळे किरपे, येणके नंतर आता तारूख व कूसूरू भागात शेतकरी, … Read more