‘त्या’ कागदपत्रांवर रितेश देशमुखने केला ट्विटर द्वारे खुलासा

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांचे काही कागदपत्रे सोशल मिडीया वर चांगलेच व्हायरल झाले होते. यावर सामाजिक कार्यकर्त्या मधूपूर्णिमा किश्वर यांनी कागदपत्रांचे फोटो शेअर करत ”चुकीच्या पद्धतीने ४ कोटी ७० लाख रुपयांचं कर्ज माफ करून घेतले असल्या”चे त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे सगळीकडे हा मोठा चर्चेचा विषय बनला होता. मात्र आता स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांना याबाबत खुलासा करण्यासाठी समोर यावे लागले आहे. त्यांनी ट्विट करत या सर्व आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रचाराच्या रणधुमाळीत ‘धीरज देशमुख’ रुग्णालयात!

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख आजारी पडले आहेत. धीरज देशमुख यांना लातूरमधील रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे सर्वच उमेदवार जोमाने प्रचार करत आहेत. प्रचाराची धावपळ आणि तब्येतीकडे झालेलं दुर्लक्ष धीरज देशमुख यांना महागात पडलं.

लातूरमधील देशमुखी कायम राहणार का? अमित आणि धीरज देशमुखांच्या प्रचारसभांना कुटुंबीयांचीही उपस्थिती

दोन्ही भावांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये दाखल झालेला अभिनेता रितेश देशमुख सध्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

आता विधानसभा निवडणूकाही होणार ‘इको फ्रेंडली’ – जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर प्रतिनिधी। सध्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येने संपूर्ण जग त्रासलेले असताना राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका देखील पर्यावरण पूरक होण्यासाठी निवडणूक आयोगाने सकारात्मक पाऊल उचलले आहेत. लातूर शहरामध्ये याची सुरुवात होणार आहे. ‘विधानसभेच्या उमेदवाराने प्रचारा दरम्यान हारतुऱ्यां ऐवजी झाडे भेट दिल्यास उमेदवारांच्या निवडणूक खर्चात सवलत देण्यात आली असून एका झाडाला केवळ एक रुपया खर्च गृहीत धरला जाणार … Read more

लातूरमध्ये खाजगी क्लासेसवर आयकर विभागाची धाड

लातूर प्रतिनिधी। आयकर विभागाच्या वतीने आज लातूर मध्ये खासगी ट्युशन क्लासेस परिसरामध्ये धाडी टाकण्यात आल्या. क्लासेस परिसरातील मोठ्या क्लासेस वरती एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या टाकण्यात आलेल्या धाडीत आयकर विभागाचे अधिकारी आणि त्यांच्या दिमतीला पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसत आहे. यामुळे खाजगी क्लासेसने आपल्या नियमित वर्गांना आज सुट्टी … Read more

अबब !! मिरज लातूर पाण्याच्या रेल्वेचं बिल १० कोटी

लातूर प्रतिनिधी | दुष्काळ आणि तीव्र पाणी टंचाईमुळे २०१६ मध्ये लातूरला सांगली जिल्ह्यातील मिरजहून रेल्वेने पाणी दिलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना रेल्वे विभागाने महापालिकेला तब्बल १० कोटीचं बिल दिलं आहे. दरम्यान तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी लातूरची दुष्काळी परिस्थिती पाहून मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर १० कोटीचे बिल आल्यामुळे … Read more

खळबळजनक! रात्रीच्या अंधारात लातूर बस स्थानकावर गोळीबाराचा थरार

Untitled design

लातूर प्रतिनिधी |लातूर शहरातील  बसस्थानकात गुरुवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.  प्लॅटफॉर्म  नजीक  थांबलेल्या बसमधून एकाने गोळीबार केल्याने  परिसराला पोलीस छावणीचे  स्वरूप आले होते. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत अज्ञात व्यक्तीने  बसमधून गोळीबार केल्याने बसस्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हल्लेखोराने झाडलेली गोळी खिडकीजवळ असलेल्या लोखंडी रॉडवर आदळली आणि हल्लेखोरालाच लागली. त्यामुळे  … Read more

बचत गटांना जनावरांसाठी प्राधान्याने चारा डेपो देण्यात येईल – पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर

Mahadev Jankar

लातूर । सतिश शिंदे राज्यात बहुतांश तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या भागातील जनावरांसाठी लागणारा चारा डेपो महिला बचत गटांना प्राधान्याने चारा डेपो देण्यात येतील, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केली. लोदगा ता.औसा येथील पशु सर्वरोग निदान शिबीर व पशुसंवर्धन दवाखाना उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास कृषिमुल्य … Read more

महाराष्ट्रातील लातूर आणि  हिंगोली जिल्ह्यातील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान

Latur ZP School

लातूर | सतिश शिंदे केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ शाळा स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या देशातील ५२ शाळांमध्ये राज्यातील दोन शाळांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील लातूर आणि हिंगोली जिल्ह्यामधील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय या राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यामध्ये लातूर … Read more

#MarathaReservation | बंद मुळे लातुर मधे नेमकं झालं काय ?

क्रांन्ति मोर्चा लातूर

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला. पहाटेपासूनच शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या एस.टी. बसेस बंद होत्या. येथील मध्यवर्ती बसस्थानक, बसस्थानक क्र. २ याचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आडत बाजार, पेट्रोल पंप, सिनेमागृह सर्व प्रकारची दुकाने सकाळी पासून बंद अाहेत. मात्र वैद्यकीय सेवा आणि औषधी … Read more