विधानपरिषद बरखास्तीचा आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय; विधानपरिषदेत संख्याबळ नसल्यामुळे घेतला निर्णय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आपल्या झुंजार पदयात्रांनी राज्यभर काढलेल्या दौऱ्यांतून आंध्रप्रदेशची सत्ता काबीज केलेल्या वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताधारी वायएसआर काँग्रेस सरकारने राज्य विधीमंडळातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. सोमवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवडा अमरनाथ यांनी ही माहिती दिली. यापूर्वी मुख्यमंत्री वायएस जगन … Read more

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन

वृत्तसंस्था | माजी कायदामंत्री,ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते आजारी होते. देशातील सर्वोत्कृष्ट विधीज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे. जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते. त्यांची दुसरी मुलगी राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले … Read more

पेट्रोल, डिझेलवरील वाहनांवर बंदी नाही- नितीन गडकरी

वृत्तसंस्था | मंदीचा फटका बसलेल्या वाहन उद्योगाला दिलासा देणारी ही बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनं सुरूच राहतील. त्यांच्यावर बंदी येणार नाही, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. ईलेक्ट्रिक वाहन उद्योगांना चालना देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांच्या विक्रीवर त्याचा थेट परिणाम झाल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पेट्रोल आणि … Read more

काँग्रेस नेते हरीश रावत यांच्याविरुद्ध सीबीआय गुन्हा दाखल करणार ?

टीम, HELLO महाराष्ट्र | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि कर्नाटकमधील ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेले डीके शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचा आणखी एक नेता ‘सीबीआय’च्या रडारवर आहे. २०१६ च्या कथित स्टिंग व्हिडिओप्रकरणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरुद्ध सीबीआय गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. २०१६ मध्ये सत्तेत राहण्यासाठी आणि सत्तेविरुद्ध बंड करणाऱ्या आमदारांना … Read more

भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्स दाखल

टीम, HELLO महाराष्ट्र |भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात वाढ झाली आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आठ शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबच्या पठाणकोट हवाईतळावर आठ अपाचे हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टर्सची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. परिणामी भारतीय हवाई दलाची … Read more

मोदींना बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

टीम, HELLO महाराष्ट्र | सार्वजनिक स्वच्छतेच्या हेतूने देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरु करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा गौरव केला जाणार आहे. बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून त्यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने दिली. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. … Read more

एनआरसीची अंतिम यादी जाहीर, तब्बल १९.०६ लाख लोकांना यादीत स्थान नाही

 टीम, HELLO महाराष्ट्र | आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तर तब्बल १९.०६ लाख लोकांना यादीत स्थान मिळालेले नाही. दरम्यान, या अंतिम यादीसंदर्भात काँग्रेसने दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. यात त्या लोकांचा समावेशही आहे, ज्यांनी आपल्या … Read more

अमित शहा देशाचे लोहपुरुष, मुकेश अंबानीची स्तुतीसुमने

टीम, HELLO महाराष्ट्र | भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच देशाचे लोहपुरुष आहेत सच्चे कर्मयोगी आहेत असं म्हणत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अमित शाह यांची स्तुती केली आहे. खरंतर लोहपुरुष ही उपमा खरंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना देण्यात आली आहे. लोहपुरुष या नावानेही सरदार पटेल यांना ओळखले जाते. नेमकी हीच उपमा मुकेश अंबानी … Read more

महिलांच्या बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुपटीहून अधिक

टीम, HELLO महाराष्ट्र | भारतातील महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत त्यांची शैक्षणिक पात्रता बरोबरची असून दुपटीने अधिक आहे असे अभ्यासात दिसत आहे. ‘जेंडर इनक्लुजन इन हायरिंग इन इंडिया’ या शीर्षकाखाली हार्वर्डचे विद्यार्थी राशेल लेव्हेनसन व लायला ओकेन यांनी संशोधन निबंध सादर केला असून त्यात म्हटले आहे,की देशात ८.७ टक्के सुशिक्षित स्त्रिया बेरोजगार आहेत; तुलनेने चार टक्के … Read more

जीडीपी ५.८ वरुन ५ टक्क्यांवर , मोदी सरकारला मोठा झटका

टीम, HELLO महाराष्ट्र | देशात मंदी आहे पण ते मान्य करण्याचे धाडस मोदी सरकार करत नाही. मात्र, जागतिक मंदी असल्याचे सांगून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे, असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. परंतु देशात मंदी आहे. त्यातच आता आणखी एक चिंताजनक वृत्त हाती आले आहे. देशाचा जीडीपी वाढण्याऐवजी घटला आहे. त्यामुळे मोदी सरकारला मोठा … Read more