उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केजरीवाल यांना तब्बल ६ तास रांगेत उभं राहावं लागलं

आम आदमी पक्षाचा उमेदवार म्हणून आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना केजरीवाल यांना तब्बल ६ तास आपला अर्ज दखल करण्यासाठी लागले. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार अरविंद केजरीवाल रिटर्निंग अधिकाऱ्याच्या कार्यालयात आज मंगळवारी १२ वाजता पोहोचले यावेळी त्याचे आई-वडील आणि पत्नी सोबत होत्या.

हिंसाचाराचा कट २८ ऑक्टोबरलाच रचला गेला : अभाविप

जेएनयू हिंसाचाराबाबत आज सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पत्रकार परिषद घेतली. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि व्हायरल झालेल्या चॅटची चौकशी झाली पाहिजे. ते म्हणाले की त्या ग्रुपची सर्व संख्या तपासली पाहिजेत जेणेकरुन त्याची सत्यता कळू शकेल.

केरळच्या मुख्यमंत्र्यानी दिल्लीमध्ये घेतली आयेशी घोषची भेट

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयेशी घोष हीची भेट घेतली आणि म्हणाले की विद्यापीठातील फी वाढ आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. विजयन यांनी आयेशीची दिल्लीतल्या केरळ भवनामध्ये भेट घेतली, आयेशीची भेट घेऊन तिला सुधन्वा देशपांडे यांचे ‘हल्ला बोल: द डेथ अँड लाइफ ऑफ सफदर हाश्मी’ हे पुस्तक भेटवस्तू म्हणून दिली. विशेष म्हणजे, मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांच्या एका गटाने विद्यापीठ परिसरात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला, त्या दरम्यान आयेशीच्या डोक्याला जबर मार लागला होता. आयेशीला तिच्या आणि जखमी झालेल्या इतर विद्यार्थ्यांच्या प्रकृतीविषयी विचारले असता, विजयन म्हणाले, “न्यायाच्या लढाईत संपूर्ण देश जेएनयूएसयू सोबत आहे. तुमच्या आंदोलनाबद्दल सर्वांना माहिती आहे आणि तुम्हाला काय झाले आहे हे देखील सर्वांना माहीत आहे.” सीपीआयच्या ज्येष्ठ नेत्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की जेएनयूचे विद्यार्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात मोठी लढाई लढत आहेत. विजयन म्हणाले, “आयेशी घोष जखमी असूनदेखील लढाईचे नेतृत्व करत आहे.”

भाजपला दिलेलं प्रत्येक मत हे मोफत वीज-शिक्षण-आरोग्यसेवेच्या विरोधात असेल : मनीष सिसोदयांचा घणाघात

“आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळणारे प्रत्येक मत मोफत वीज, शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या विरोधात असेल”, असा घणाघात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.

‘यूनिटी अगेन्स्ट लेफ्ट व्हाॅट्सॅप ग्रुपच्या सदस्यांची ओळख पटली, १० लोक कॅम्पसच्या बाहेरचे’

जेएनयू हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या SIT ने ‘यूनिटी अगेन्स्ट लेफ्ट’ नावाच्या व्हाॅट्सॅप ग्रुपच्या सदस्यांना ओळखलं आहे. या ग्रुपमध्ये एकूण ६० सदस्य होते. त्यापैकी ३७ लोकांना पोलिसांना ओळखण्यात यश आलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या सूत्रानुसार त्यातले १० लोक कॅम्पसच्या बाहेरचे होते. म्हणजे हिंसेमध्ये सामील असणारे हे १० लोक, त्यांचा कॅम्पसशी कुठलाच संबंध नाही. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही गटांनी हिंसाचारात बाहेरच्या लोकांची मदत घेतली.

कन्हैय्याचा दिल्ली पोलिसांवर पक्षपाताचा आरोप

“दिल्ली पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली ती दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद वाटतच नव्हती, ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पत्रकार परिषद वाटतच होती.” असा घणाघाती आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने दिल्ली पोलिसांवर केला.

14 नोव्हेंबर ऐवजी 26 डिसेंबर रोजी बालदिन साजरा करा; खासदार मनोज तिवारी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 14 नोव्हेंबर ऐवजी 26 डिसेंबर रोजी बाल दिन साजरा करावा आणि त्यासाठी ‘बाल दिना’ची तारीख बदलण्याची विनंती केली आहे.

वर्ल्ड यूथ समिटसाठी डॉ. मनीषा पाटील यांची निवड

सातारा प्रतिनिधी | नवी दिल्ली येथे शुक्रवारी होणाऱ्या वर्ल्ड युथ समिटमध्ये बोलण्यासाठी डॉ. मनीषा पाटील यांची निवड झाली आहे. रूरल गर्ल्स एम्पावरमेंट – अ चॅलेंज इन अचिव्हिंग एडिजीएस बाय २०३० या विषयावर उपस्थित श्रोत्यांना त्या मार्गदर्शन करतील. ६० देशांतून आलेल्या ३००० अर्जांमधून ५ व्यक्तींची निवड करण्यात आली असून डॉ. मनीषा पाटील त्यातील एक आहेत. मनीषा … Read more

अमित शहा यांच्या रडारवर माओवादी ?

टीम, HELLO महाराष्ट्र | गृहमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर अमित शहा यांनी सोमवारी पहिल्यांदा जी बैठक बोलावली ती फक्त नक्षल समस्ये संदर्भात काय उपाययोजना करता येईल यासाठी होती. या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे महासंचालक उपस्थित होते.जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांचं पुढचं लक्ष्य माओवादी आहेत का? … Read more

माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा हटविली

टीम, HELLO महाराष्ट्र | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विशेष सुरक्षा (एसपीजी) हटविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. आता मनमोहन सिंग यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, सुरक्षेचा निर्णय पूर्णपणे प्रोफेशनल आधारावर घेण्यात आला आहे. ठरविक वेळेनंतर सुरक्षेचा आढावा घेण्यात येतो. त्यानंतर सुरक्षा … Read more