शरद पवारांनी आम्हाला प्रेरणा दिली – हेमंत सोरेन

मुंबई : शरद पवार यांनी आम्हाला जिंकण्याची प्रेरणा दिली असं मत झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे होणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्यक्त केले आहे. झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून सत्ताधारी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयाचे नायक झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन … Read more

चप्पल दाखवा, दगडफेक करा हे शिवसेनेचे जुने छंद, अमृता फडणवीस यांचे शिवसेनेला सडेतोड उत्तर

मुंबई : शिवसेनेच्या जोडे मारो आंदोलनाला अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. या आंदोलनाचा समाचार अमृता फडणवीस यांनी या ट्विटवरून घेतला आहे. हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. चप्पल दाखवा, दगडफेक करा, हे शिवसेनेचे जुने छंद आहेत, अशी टीका करून त्यांनी शिवसेनेच्या जोडे मारो … Read more

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला(NPR) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी, काय आहे NPR?

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला(NPR) केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, एप्रिल ते सप्टेंबर २०२० पर्यंत ही जनगणना केली जाईल. जनगणनेत कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. जो कोणी भारतात राहतो त्याची गणना केली जाईल. यासाठी एक खास अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. एनपीआर अंतर्गत भारतीय नागरिकांच्या बायोमेट्रिकची नोंद केली … Read more

भडकाऊ भाषण दिल्याबद्दल सोनिया,प्रियंका यांच्यासह ओवेसी विरोधात तक्रार दाखल

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि रॅमन मॅगसेसे विजेते पत्रकार रवीशकुमार यांच्याविरोधात भडकाऊ भाषण दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. सुधारित नागरिकत्व  कायद्याविषयी (सीएए)  चारही जणांवर भडकाऊ भाषणे केल्याचा आरोप आहे. सीजेएम कोर्टाने ही तक्रार मान्य केली असून सुनावणीसाठी 24 जानेवारी 2020 ची तारीख निश्चित … Read more

CAA PROTEST, द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांच्यासह आठ हजार जणांवर गुन्हा दाखल

टीम, हॅलो महाराष्ट्र : चेन्नई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध देशभर आंदोलन सुरु आहेत..नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या विरोधात द्रमुक आणि मित्रपक्षांनी सोमवारी चेन्नईत भव्य मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांची परवानगी न घेता काढल्यामुळे द्रमुकचे नेते एम.के. स्टालिन यांच्यासह आठ हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम देखील सहभागी … Read more

भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं – शरद पवार

टीम,HELLO Maharashtra मुंबई । झारखंड निवडणुकीचे निकाल पाहता देशातील जनता भाजपाविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरूनही भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, … Read more

सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून येणाऱ्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव

टीम, HELLO Maharashta : १९९५ नंतर सलग पाच वेळेस विधानसभेवर निवडून येणारे झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे बंडखोर नेते माजी मंत्री सरयू रॉय यांनी त्यांचा पराभव केला आहे. जमशेदपूर पूर्व विधानसभा निवडणुकीत रघुवर दास विरुद्ध सरयु रॉय यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. भाजपचे बंडखोर नेते … Read more

झारखंड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

टीम हॅलो महाराष्ट्रा – रांची। झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून काँग्रेस आघाडी विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. महाराष्ट्रापुरती मर्यादित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झारखंडमध्ये विजयी पताका फडकावली आहे.हुसैनबाद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कमलेशकुमार सिंग विजयी झाले आहेत. बहुजन समाजवादी पार्टीचे शेर अली त्यांच्या विरोधात मैदानात होते. त्यांना १९ % मते मिळाली आहेत … Read more

मद्यपींसाठी खुशखबर! 31 डिसेंबरला पब, बार, हॉटेल्स पहाटे ५ पर्यंत सुरु राहणार

२४,२५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत बार सुरु राहणार आहेत, तर वाईन शॉप रात्री १ पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून यासंबधीचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले. त्यामुळे पार्टीचे नियोजन असणारांसाठी हि आनांदाची बातमी आहे.

अजित पवारांना मोठा दिलासा; सिंचन घोटाळ्या प्रकरणी एसीबीची क्लीन चिट

जनमंच संस्था व व्यावसायिक अतुल जगताप यांनी दाखल केलेल्या जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रामाणिकेतवर संशय व्यक्त करत, या प्रकरणात अजित पवारांचे नाव असल्याने चौकशी अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचा आरोप केला होता