हाॅटेल सील ः सांगलीत लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

सांगली | सांगली शहरात शासनाच्या लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सिव्हिल रोडवरील अनुराधा हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. सांगली शहर पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून सदर हॉटेल हे सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एस. एस. खरात यांनी ही कारवाई केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाकडून कडक लॉकडाऊन लागू … Read more

BREKING NEWS : राष्ट्रवादीच्या सातारा येथील कार्यालयावर दगडफेक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थाना बाहेर शेणीच्या गोवऱ्या पेटवल्याचा खळबळजनक प्रकार घडला. त्यानंतर लगेचच सातारा येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठा आरक्षण रद्द केल्याचे सातारा शहरात पडसाद पहायला मिळाले. सातारा शहरात राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यालय आहे. या कार्यालयावर दगडफेक करून काच फोडण्यात … Read more

वडूज पोलिसांची 21 वाहनांवर कारवाई, 31 हजारांचा दंड वसूल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केल्यावर वडूज पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांकडून पोलिसांनी सुमारे 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला असून 21 वाहनांवर विविध गुन्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. वडूज पोलिस ठाणे हद्दीत उपविभागीय अधिकारी दहिवडी विभाग डॉ. नीलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मालोजीरावराव देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वडूज … Read more

पोलिसांकडून 500 गाड्या जप्त ः साताऱ्यात विनाकारण बाहेर पडणा-यावर कडक कारवाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याची कोरोनाबधित सख्या वाढत आहे. किराणामाल, फळशेती, भाजीपाला असेल त्यांना पूर्णतः बंद करण्यात आले आहे. कालपासून कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. सातारा शहरांमध्ये पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर बाहेर येणाऱ्या लोकांवर कडक कारवाई सुरू आहे. लाॅकडाऊनमध्ये पोलिसांनी 500 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 500 गाड्यांचा … Read more

कडक लाॅकडाऊन ः कराड, सातारा शहरात पोलिसांकडून गाड्या जप्त, वाहनचालकांची पळापळ

सातारा | सातारा जिल्ह्यात आजपासून सात दिवसांच्या कडक लाॅकडाऊनला प्रारंभ झाला आहे. कराड शहरात तसेच सातारा शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वाहनांची तपासणी करून गाड्या जप्त करून त्यांच्यावर केसेस दाखल करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी चांगली तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यात सर्वंत्र सकाळी सात ते अकरा … Read more

मसूर गावात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ग्रामीण भागात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आज मसूर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आठ दिवस दवाखाने व मेडिकल वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मसूर गावात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. मसूर मधील सर्व किराणामाल, भाजीपाला, बेकरी वाले, दुग्धजन्य पदार्थ,. … Read more

साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी पालिका आणि पंचायत समितीवर साेपिण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सातारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तहसिलदार आशा हाेळकर यांनी काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून विनाकारण फिरणा-यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई पोलिसांनी केली. … Read more

अवैध वाळू वाहतूकीवर सापळा रचून पोलिसांची कारवाई, दोघांना अटक

मायणी | खटाव तालुक्यातील कलेढोण येथील विटा-कलेढोण मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मायणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विटा-कलेढोण मार्गावर कलेढोण हद्दीतून डंपरमधून अवैद्य वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांकडून पोलिसांना … Read more

चोरीचे दागिने विकण्यास आलेल्या चोरट्यास पोलिसांकडून अटक

Crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर व परिसरात चोरी करणार्‍यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. ही कारवाई मंगळवारी सकाळी ओगलेवाडी येथे करण्यात आली. शितल गोरख काळे (रा. ओगलेवाडी, ता. कराड) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर येथील शिवाजी … Read more

सातारा शहरात रूग्णवाहिकेने दुचाकीला 50 फूट फरफटत नेले, चालक फरार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील एसटी बसस्थानकांच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पारंगे चाैकात एका रूग्णवाहीकेने दोन जणांना जोरदार धडक देवून जखमी केल्याची घटना घडली आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून रूग्णवाहिकेचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील पारंगे चाैकात ॲम्बुलन्सने क्रमांक (एम एच-20 डब्लू- 9796) दुचाकीला जवळपास 50 … Read more