Railway कडून 212 गाड्या रद्द !!! आपल्या गाडीचे स्टेट्स तपासा

Ganpati Special Trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध कारणांमुळे Railway ने आज म्हणजेच 13 जुलै रोजी 212 गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय रेल्वेने 25 गाड्या अंशत: रद्द केल्या असून 27 गाड्यांचे डेस्टिनेशन स्‍टेशन बदलले आहे. या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पॅसेंजर, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे स्टेशनला जाण्यापूर्वी आपल्या गाडीचे स्टेट्स जाणून घेतले पाहिजे. महाराष्ट्र, दिल्ली-एनसीआर आणि … Read more

मध्य रेल्वेमध्ये सहा दिवसांचा मेगा ब्लॉक; मुंबईकडे जाणारी ‘ही’ रेल्वे रद्द 

railway

  औरंगाबाद – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांसाठी जनशताब्दी रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेतील इगतपुरी येथील टिटोली यार्डातील तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने आज शनिवारपासून सहा दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.   मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच काही … Read more

Railway : ट्रेनचे तिकीट हरवले तर डुप्लिकेट तिकीट कसे मिळवावे ते समजून घ्या

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway : भारतातील वाहतुकीच्या प्रमुख साधनांपैकी रेल्वे हे एक आहे. दररोज लाखो लोकं रेल्वेतून प्रवास करतात. त्यासाठी तिकीट काढणे बंधनकारक आहे. विना तिकीट प्रवास करणे हा एक गुन्हा आहे. यासाठी तिकीट नसलेल्या प्रवाशांना मोठा दंड भरावा लागेल. अनेक वेळा प्रवाशांसोबत असेही घडते की तिकीट घेतल्यानंतर ते हरवते. जर प्रवास करताना तिकीट … Read more

विशेष रेल्वेच्या यादीतून ‘पर्यटन राजधानी’ गायब; दमरेचे दुर्लक्ष

railway

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध विभागांतून उन्हाळी सुट्यांत विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. मात्र, या विशेष रेल्वेच्या यादीतून राज्याची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद गायब आहे. केवळ तिरुपतीसाठी आठवड्यातून एक दिवस विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. इतर शहरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नसल्याने गर्दीतूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे. उन्हाळी सुट्यांमुळे अनेकांकडून पर्यटनाचे नियोजन … Read more

जालना-औरंगाबादहून नवीन वर्षात धावणार इलेक्ट्रिक इंजिन

railway

औरंगाबाद – मनमाड (अंकाई) ते रोटेगाव रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान 5 महिन्यांत म्हणजे सप्टेंबरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल. तर औरंगाबाद ते जालना दरम्यान फेब्रुवारी 2023 पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केंद्रीय रेल्वे विद्युतीकरण … Read more

3 वर्षीय चिमुकलीसह आईनं घेतली धावत्या रेल्वेतून उडी; असं काय झालं?

औरंगाबाद : विवाहितेने पोटच्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेने रेल्वेतून उडी मारुन मुलीसह आपल्या आयुष्याची अखेर केली. औरंगाबाद जिल्ह्यात हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 24 वर्षीय महिलेने टोकाचं पाऊल उचललं. हाती आलेल्या माहितीनुसार, औऱंगाबादमधील पोटूळ रेल्वे स्टेशनच्या जवळ ही घटना घडली आहे. महिलेने स्वतःसोबत 3 वर्षांच्या मुलीचीही जीवनयात्रा संपवली. मायलेकीने … Read more

औरंगाबादजवळ पुर्ण मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

औरंगाबाद – औरंगाबाद येथील दौलताबाद रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा रॅक घसरण्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नांदेड- मुंबई रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झालेली आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी किमान दुपारी 12 ते 1 वाजेल असा प्राथमिक अंदाज आहे. दौलताबाद रेल्वेस्टेशनजवळ रेल्वे मालगाडी रॅक घसरली. यात एका रुळावरून थेट दुसऱ्या … Read more

शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गासाठी सुधारित प्रस्ताव

railway shivajinagar

औरंगाबाद – शिवाजीनगर रेल्वेगेटच्या भुयारी मार्गासाठी आता सुधारित प्रस्ताव पाठविला जाणार आहे. विकास आराखड्यात नसलेल्या 24 मीटर रस्त्यासह भूसंपादनाचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावा, असे पत्र भूसंपादन अधिकाऱ्यांनी प्रशासकांना दिले आहे. शिवाजीनगर रेल्वेगेटला भुयारी मार्ग नसल्याने याठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे बीड बायपास परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. वर्षानुवर्षे केलेल्या पाठपुराव्यानंतर आता भुयारीमार्गासाठी प्रयत्न सुरू … Read more

ड्युटी बजावत असताना स्टेशन मास्तरचे ह्रदयविकाराने निधन; दिड तास रेल्वे वाहतूक ठप्प

औरंगाबाद – परळी- हैद्राबाद रेल्वे मार्गावरील घाटनांदूर रेल्वेस्थानकावरील रात्रीचे ड्युटी बजावीत असताना स्टेशन मास्तरचे आज पहाटे अडीच ते साडे तीनच्या दरम्यान ह्रदयविकाराने निधन झाले. यामुळे यामार्गावरील दिड तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. परळी- हैद्राबाद रेल्वे मार्गावरील घाटनांदूर रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले रेल्वे स्टेशन मास्तर मुसाफिर सिंह (44) हे रविवारी दिवसा बारा तासाची ड्युटी करून … Read more

अखेर अंकाई ते रोटेगाव दरम्यान धावले इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन; औरंगाबाद पर्यंत कधी होणार विद्युतीकरण?

औरंगाबाद – बहुप्रतिक्षित मनमाड ते मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मनमाड (अंकाई) ते रोटेगावदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावर काल सायंकाळी इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन धावले. हा क्षण पाहणे रेल्वे प्रवाशांसाठी आनंददायी ठरला. आता पुढील टप्प्यात औरंगाबादपर्यंत इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन धावेल. त्यामुळे रेल्वेचा प्रवास गतिमान होण्यास मदत होईल. मनमाड (अंकाई) ते रोटेगाव मार्गावर … Read more