103 दिवस तुरुंगात गेल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे; चित्रा वाघ यांची नाव न घेता राऊतांवर टिका

Satara Women's Day Chitra Wagh

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके विरोधक वेळोवेळी भाजपवर छत्रपतींचा अपमान होत असल्याचे आरोप करता असतात. विरोधक बोलत राहतील त्यांच्या गोष्टी फार काय मनावर घेऊ नये, ते सध्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निघून गेल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. एकजण तर 103 दिवस तुरुंगात जाऊन आले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याने ते वाट्टेल … Read more

जीभ हासडण्याची भाषा कराल तर जशास तसं उत्तर देऊ; शंभूराज देसाईंचा ठाकरेंना इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके उद्धव ठाकरे यांच शिमगा सभेचं भाषण हे दर्जा घसरलेलं होतं. तसंच खालच्या स्थराला जाऊन त्यांनी हे भाषण केलं. महाराष्ट्रातल्या सामान्य शिवसैनिकांची घोर निराशा यामुळं झाली आहे. ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा सांगता. त्यांना ही भाषा शोभत नाही. पुन्हा जर जीभ हासडण्याची भाषा कराल तर याला जशास तसं उत्तर दिलं … Read more

डिपॉझिट जप्त झालेल्यांनी विधानसभेच्या गप्पा मारू नये : शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हर्षद कदम हे शिवसेनेच्या तिकिटावर लढुन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेले होते. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते त्यांनी आता विधानसभेच्या गप्पा मारू नये, असा टोला उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे. ते कराड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. कराड येथील पत्रकार परिषदेवेळी मंत्री देसाई म्हणाले … Read more

छत्रपतींच्या वंशजांना उमेदवारी न देणाऱ्यांनी आमच्या घराण्याबाबत बोलू नये; शिवेंद्रराजेंचे राऊतांना प्रत्युत्तर

Shivendraraje Bhosale Sambhajiraje Sanjay Raut

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके “छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही? संजय राऊतांनी खा. संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्याला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही,” असे प्रत्युत्तर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊत यांना दिले. काल साताऱ्यातील … Read more

निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही, शिवसेना खोकेवाल्यांनी विकत घेतली; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची शिवगर्जना यात्रा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात ती आमची नसून जनतेची शिवगर्जना आहे. धनुष्याच्या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही, हेच राज्यभर फिरल्यावर दिसून येते. जनतेच्या मनात काय चीड निर्माण झाली आहे, ती खोकेवाल्यांनी पाहावी. जे चाळीस चोर ज्या पद्धतीने सेनेशी बेईमानी करून पळून … Read more

संजय राऊत भाडखाऊ…; भर सभागृहात कारवाईची मागणी करताना भरत गोगावले काय बोलून गेले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त विधान केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत राऊतांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडला. यावेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर टीका करताना ‘भाडखाऊ’ शब्द वापरल्याने एकच गदारोळ सुरु … Read more

संजय राऊतांना वादग्रस्त विधान भोवणार? भाजप-शिंदे गटाच्या आमदारांनी सभागृहात केली ‘ही’ मागणी

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांच्यासमोर सत्ताधाऱ्यांनीच आक्रमक पावित्रा घेतला. खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आहा विधिमंडळाच्या सभागृहात उमटले आहेत. मुद्दा उचलून धरत थेट हक्कभंग आणण्याची मागणी सत्ताधारी गटाच्या आमदारांनी केल्यानंतर राज्य सरकारकडून याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राऊतांना वादग्रस्त विधान भोवणार असल्याचे … Read more

संजय राऊतांचं विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले की…

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसरा दिवशी विरोधक राज्यातील शेती, महागाईच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असताना आज ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. … Read more

एकनाथ शिंदेंचा गौतम अदानी झालाय, त्यांनी आता..; सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Gautam Adani Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवस्था गौतम अदानी यांच्यासारखी झाली आहे. ज्याप्रमाणे अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स दणादण कोसळत आहेत. त्यांची फुगवलेली श्रीमंती जागतिक यादीतून हद्दपार झाली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांची गत झाली आहे. मुख्यमंत्री फक्त खुर्चीवर आहेत व कारभाराची सूत्रे दिल्लीतून हलत आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाकडून सामनातील अग्रलेखातून करण्यात आला … Read more

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. आज ठाकरे गटाकडून उर्वरित युक्तिवाद होणार असून त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. खंडपीठासमोर ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत बाजू मांडणार आहे. त्यानंतर शिंदे गटाच्यावतीने जेष्ठ वकिल हरिश साळवे बाजू मांडणार आहेत. मागील सुनावणीच्या वेळी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित … Read more