अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवबंधन बांधणार; शिवसेनाप्रवेशानंतर मोठे खुलासे करण्याची शक्यता

मुंबई । काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जात उर्मिला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. मात्र भेटीची वेळ अद्याप ठरलेली नाही. तर दुपारी 4 वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उर्मिला मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. लोकसभा … Read more

….म्हणूनच विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी ; संजय राऊतांनी केला खुलासा

Raut and Urmila

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाविकास आघाडीकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शुक्रवारी सोपवण्यात आली असून शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याचं कारण … Read more

झालं फायनल! राष्ट्रवादीकडून खडसे, शेट्टी, आनंद शिंदें, तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे उमेदवारी

मुंबई । महाविकास आघाडीने आज अखेर राज्यपाल नियुक्त जागांसाठी 12 सदस्यांची नावं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहेत. त्यात शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे आणि काँग्रेसकडून सचिन सावंत आणि मुझफ्फर हुसेन आदी नावांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब … Read more

उर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी?

मुंबई । राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे नाव पाठविले असल्याची चर्चा सुरू आहे. तर अभिनेता शरद पोंक्षे यांचेही नाव राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने पाठविले असल्याचे समजते. शिवसेनेच्या कोट्यातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. कालच उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिला होता. त्यामुळे आता शिवसेनेच्या कोट्यातील आणखी … Read more

जुने शिवसैनिक आता जागले नाहीत.. तर ते स्वतःचं वाटोळं करून घेतील; निलेश राणे

Nilesh Rane

मुंबई । विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव पाठविले असल्याची चर्चा सुरू आहे. तर अभिनेता शरद पोंक्षे यांचेही नाव राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने पाठविले असल्याचे समजते. यावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसैनिकांना उद्देशून टि्वट केले आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, “जुने शिवसैनिक जर या क्षणाला जागले … Read more

उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसची विधान परिषदेची उमेदवारी नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

मुंबई । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं वृत्त असतानाच काँग्रेसनेही त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली होती. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. आम्ही उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी … Read more

उर्मिला मातोंडकर बांधणार शिवबंधन ; विधानपरिषदेसाठी दर्शवला होकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर विधानपरिषदे साठी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिलाला फोन करून आमदारकीची ऑफर दिली होती आणि उर्मिलानेही ही ऑफर स्वीकारली असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. उर्मिला मातोंडकरने सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगना राणौतला जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आली होती. कंगनाचा सामना … Read more

विधान परिषदेसाठी उर्मिला मातोंडकरच्या नावावर शिवसेनेचा मोठा खुलासा, म्हणाले..

मुंबई । राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा होती. यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याचे सांगितले जात आहे. अशातच उर्मिला मातोंडकरच्या नावावर शिवसेनेनं सूचक विधान केले आहे. उर्मिलाचे नाव आमच्याकडे चर्चेत नाही, प्रस्ताव पाठवू, त्यानंतर काय होतंय ते पाहू, असं … Read more

‘एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील’- निलेश राणे

Nilesh rane and uddhav thakarey

मुंबई । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजतेय. या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत असल्यानं जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज … Read more

काँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेचं तिकीट?

मुंबई । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं कळतं. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी बातचीत केल्याचं कळतं. उर्मिला मातोंडकर … Read more